ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

शेती उपयोगी ट्रॅक्टरचे पार्टस चोरीच्या मालासह आरोपी ताब्यात!

रिसोड पोलिसांची कामगिरी!

रिसोड : पोलीस स्टेशन रिसोड  येथे 16/6/2025 रोजी सचिन पऱ्हाड रा. बाळखेड यांचे फिर्याद वरून शेती उपयोगी असलेल्या ट्रॅक्टर चे पान्हे व जॅक असे साहित्य चोरीचा गुन्हा दाखल असुन या गुन्ह्यात आरोपी संदीप नामदेव बोडखे वय 30 वर्षे रा. करंजी गरड ता. रिसोड यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता चोरी  केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे ताब्यातुन चोरीस गेलेला माल- ट्रॅक्टरचे पान्हे नग 6 किंमत 1000/- रु. ट्रॅक्टरच्या पिना नग 6 किंमत 1000/- रु. एक जॉक किंमत 4000/- रुपये असा एकुण 6000/- रु. चा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक सा.अपर पोलीस अधीक्षक मॅडम,सहा.पोलीस अधीक्षक सा.वाशीम यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांचे नेतृत्वात पो. उप नि. वसंत तहकीक, अंमलदार सुनील तिवाले, सतीश दिंडे, नाईक, प्रवीण गोपनारायण, चालक अंमलदार भस्मे यांनी केली आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.