महत्वाचे

अमरावतीत अय्याशीचा अड्डा बनविलेला फ्लॅट पोलिसांनी केला सिल

1) लॅपटॉप, टॅब व हार्डडिस्कही जप्त

2) आर्वीचा मानव सुगंधे अटक

3) अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल प्रकरण

परतवाडा प्रतिनिधी अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत काही अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या कोठडीत असलेल्या अयान कडुन अनेक धक्कादायक बाबी उघड होऊ लागल्या आहेत. अमरावती शहरातील कठोरा नाक्याजवळून एका सदनिकेत एक रूम भाड्याने घेऊन त्या ठिकाणी अनेक मुलं मुली एकत्रीत येऊन अय्याशी करत असल्याची बाबत अयान ने उघड केली. त्याचप्रमाणे सदनिकेतील रहिवाशांनी तशी माहिती प्रसार माध्यमांना दिली. याप्रकरणात वर्धा जिल्हयातील आर्वी रहिवाशी असलेल्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी अयानचा मोबाईल जप्त केला असता डिलीट मारण्यात आलेले व्हीडीओ पुन्हा पोलिसांनी रिकव्हर केले असता अनेक आक्षेपार्य व्हिडीओ दिसुन आले आहेत. सोशल मीडियावर उपलब्ध क्लिपमध्ये ८ पीडित मुलींचे १८ व्हिडिओ व ३१ फोटो आढळून आले आहेत. तपासादरम्यान व्हिडिओ क्लिप प्रसारित करणारे उजेर खान इकबाल खान (वय २०), मो. साद मो. साबीर (वय २२) व तरबेज खान तसलीम खान (वय २४), सर्व रा. अचलपूर, यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांनाही १५ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. त्यांनाही २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तसेच पुढील तपासात मुख्य आरोपीने अमरावती येथील मित्राच्या भाड्याच्या घरात पीडित मुलींचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिल्याने मानव दीपक सुगंधे (वय २०, रा. आर्वी,ह.मु. अमरावती) यालाही अटक करण्यात आली. याशिवाय व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित करणारे रैफाज खान मंजूर खान (वय २६), मो. इमरान मो. साजीद (वय २१) व शे. नावेद शे. हसन (वय २१), सर्व रा. अचलपूर, यांनाही अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींकडून मोबाईल जप्त करण्यात आले असून आरोपी ऍफाज खान याच्या ताब्यातून लॅपटॉप, टेंब व हार्डडिस्कही जप्त करण्यात आली आहे. या सर्व साहित्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार आहे. तसेच संबंधित ठिकाणांचे पंचनामे व घरझडतीही करण्यात आली आहे. या प्रकरणातील पीडित मुली व त्यांच्या पालकांची ओळख पटवून त्यांना पुढे येण्यासाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समुपदेशन केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पीडितांची ओळख गोपनीय ठेवण्याची पूर्ण काळजी घेतली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभमकुमार (भा.पो.से.) यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक गठीत करण्यात आले असून त्यात १० पोलीस अधिकारी व ३६ कर्मचारी सहभागी आहेत. या प्रकरणासंदर्भात कोणाकडेही माहिती किंवा पुरावे असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

 

ताब्यात घेतलेले आरोपी

1. अयान अहमद तनवीर अहमद

2. उजेर खान इकबाल खान

3. मो. साद मो साबीर

4. तरबेज खान तसलीम खान

5. मानव दिपक सुगंधे

6. रैफाज खान मंजुर खान

7. मो. इमरान मो. साजीद

8. थे. नावेद थे हसन

 

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.