ताज्या घडामोडीदेश विदेशफॅशनमहत्वाचेमहाराष्ट्र

गोंदिया शहरात अघोषित पाणीबाणी!

पर्यायी उपाययोजनकडे दुर्लक्ष!

गोंदिया : गोंदिया शहराला तालुक्यातील डांगोर्ली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु, मागील काही दिवसांपासून या योजनेमध्ये सातत्याने बिघाड येत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहरवासीयांना अघोषित पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. 19 जून रोजी योजनेत बिघाड आल्याने मागील दोन दिवसांपासून गोंदिया शहरात पाणी पेटले आहे. मजिप्राच्या भरवश्यावर असलेल्या ग्राहकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली. असे असले तरी पर्यायी उपाययोजनेकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरात पाणी समस्या नित्याचीच झाली आहे.

पाण्यासाठी नागरिकांची पायपीट!

 

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची आहे. यासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना कार्यरत आहेत. गोंदिया तालुक्यातील डांगोर्ली येथे उभारण्यात आलेल्या योजनेतून शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र कधी वीजपुरवठा खंडित तर कधी इतर तांत्रिक कारणामुळे पाणीपुरवठा ठप्प असतो. या तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठा योजनेला ग्रहण लागले आहे. ह्या ना त्या कारणावरून मजिप्राचा कारभार शहरात चर्चेत आहे. असे असताना यावर कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे. शहरात मागील वर्षभरापासून पाणी पुरवठ्याची समस्या कायमच डोकेदुखीचा विषय राहिला आहे. यामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. मजिप्राच्या ग्राहकांची संख्या मोठी असून अनेक जण आजही मजिप्राच्या भरवश्यावर पाण्याची व्यवस्था करीत असतात. अशा ग्राहकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील दोन दिवसांपासून शहरात पाणी पेटले आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या योजनेत बिघाड आल्याने संपूर्ण पाणी योजनेचा ठप्प पडली. यामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागली. उद्यापर्यत बिघाड दुरूस्त करून योजना कार्यान्वित होणार, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

दुरूस्तीचे काम युध्दस्तरावर!

गोंदिया शहराला पाणी पुरवठा (Water Supply) करणार्‍या योजनेत बिघाड निर्माण झाला. १९ जूनच्या रात्री दासगाव विद्युत उपकेंद्रातील रिले केबल पूर्णपणे जळाले. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा रात्रीपासूनच खंडित झाला आहे. वीज पुरवठ्याअभावी पाणीपुरवठा ठप्प असल्याने शहरातील पाणी टाक्या भरण्यास अडचण झाली. परिणामी दोन दिवसांपासून शहरात पाणी पेटले आहे. दासगाव विद्युत उपकेंद्रातील जळालेले रिले केबल बदलण्याचे काम सुरू आहे. हे काम शनिवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे शहराला रविवारी पिण्याचा पाण्याचा पुरवठा होणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सहायक अभियंता अभिजीत बागडे यांनी सांगितले.

टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ!

शहराला पाणी पुरवठा करणारी योजना मागील दोन वर्षांपासून गोंदियाकरांचा तापदायक ठरत आहे. कधी वीजपुरवठा खंडित (Power Outage) तर कधी इतर तांत्रिक कारणामुळे पाणीपुरवठा ठप्प असतो. दूषित पाणी पुरवठ्याची समस्या तर कायमच आहे. यामुळे शहरवासीय त्रस्त झाले असून मजीप्राच्या पाणीपुरवठा योजनेला ग्रहण लागल्याचे चित्र आहे. अशात पाणी पुरवठा ठप्प राहत असल्याने शहरातील अनेक वॉर्डामध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.