ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

पंकज धंदर यांची अक्षर मानव चित्रपट विभागात, अमरावती जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती : अक्षर मानव संघटनेकडून साहित्य, समाज, आरोग्य, शिक्षण, चित्रपट, पर्यावरण, विज्ञान अश्या विविध मानवी जगण्याच्या 96 विषयात संघटना काम करते. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी लेखक कथा कादंबरीकार ज्येष्ठ विचारवंत राजन खान यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना जगभर चालते. चाळीसगावच्या त्रैमासिक अक्षर मानवच्या बैठकीत अक्षर मानव संघटनेच्या अमरावती चित्रपट विभागात शहरातील फिल्म मेकर, अभिनेता, प्रशिक्षक व सामाजिक कार्यकर्ते पंकज धंदर यांची अक्षर मानव चित्रपट विभागाच्या अमरावती जिल्हा कार्याध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. अक्षर मानव संघटनेचे मुख्य पदाधिकारीं राज्य कार्यवाह आझाद खान यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. हि घोषणा अक्षर मानवचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष प्रा.श्री प्रविण जावळे, उपाध्यक्ष योग गुरू श्री दिपेश मोहिते, चित्रपट विभागाचे राज्य अध्यक्ष प्रा. प्रशांत भोले यांच्या परवानगीने महाराष्ट्राचे राज्य कार्यवाह तथा विदर्भाचे पालकमंत्री श्री आझाद खान यांनी ही घोषणा अमरावती मध्ये छोटेखानी कार्यक्रमात केली. या प्रसंगी अक्षर मानव संघटनेच्या अमरावती जिल्हा सचिव अश्विनी वितोंडे- खान, जिल्हा उपाध्यक्ष माया वाकोडे, जिल्हा संघटक शिवाजी कोकाटे ,स्नेहा वासनिक यांची विशेष उपस्थिती लाभली.
उपस्थित सर्वांनी सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींवर विचारमंथन करून आगामी उपक्रमांच्या नियोजनावर चर्चा करून पंकज धंदर यांच्या नियुक्तीने अमरावती जिल्ह्यातील चित्रपट तथा सांस्कृतिक क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असे राज्याचे अक्षर मानवचे सर्व मुख्य पदाधिकारींनी यावेळी आपली भावना व्यक्त केली आहे.
जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन केवळ ‘माणूस ‘ म्हणून सजगपणे जगणेव्यक्ती, कुटुंबापासून समाजापर्यंत माणसामाणसातल्या शत्रुत्वाची आणि दुःखाची कारणं शोधून ती नष्ट करणं, समाज आणि कुटुंब दुरुस्त करणारे अक्षर मानव संघटनेचं मुख्य कार्य आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आणि चित्रपट क्षेत्रात राज्यापातळी ते गाव पातळी पर्यंत पूर्ण विकास साधण्यासाठी स्थानिक तरुणांना चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण देऊन चित्रपट शाळा काढुन गावा-गावात रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे सुद्धा अक्षर मानव चित्रपट विभागात प्रमुख कामे होतील. अक्षर मानव चित्रपट क्षेत्रात आणि सामाजिक कार्यास नवी दिशा मिळेल असे अमरावतीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या मुख्य सचिव अश्विनी वितोंडे-खान यांनी या प्रसंगी शुभेच्छा देतांना म्हटले.
पंकज धंदर गेल्या २० वर्षांपासून “अमरावती युवा स्पंदन सिनेमा प्रोडक्शन” आणि अमरावती स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर लघुचित्रपट निर्मिती, फिल्म मेकिंग वर्कशॉप, शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करत आहेत. कोणाच्याही आर्थिक पाठबळाविना समविचारी अनुभवी तसेच नवोदित होतकरू कलाकारांना घेऊन अमरावतीला एक “चित्रनगरी” म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी ते सातत्याने प्रामाणिकपणे अविरत प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या द्वारे निर्मित काही लघुचित्रपटांना नाशिक, पाम स्प्रिंग्स, कार्ल्सबर्ग, किंडर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये निवड व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या ‘गल्ली क्रिकेट’ आणि ‘व्यथा आमच्या तिरंग्याची’ या लघुपटांनी विशेष कौतुक मिळवले आहे. अमरावती चित्रपट विभागात अभ्यासु आणि अनुभवी योग्य व्यक्तीची चित्रपट कार्याध्यक्षपदी निवड केली आहे. असे अक्षर मानवाच्या जिल्हा उपाध्यक्ष माया वाकोडे यांनी शुभेच्छा देतांना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
स्वतः पटकथा लेखक-दिग्दर्शक-अभिनेता-छायाचित्रकार-एडिटर-निर्माता अश्या विविध विभागांमधे कार्यरत असतानाच “बिइंग आर्टिस्ट अकेडमी ऑफ फ़िल्म अँड थियेटर आर्ट्स, अमरावती” च्या माध्यमातून ते सातत्याने नवोदितांना सिनेमा करियर जागरूकता चळवळ, चित्रपट निर्मितीचे रीतसर प्रशिक्षण उपक्रम राबवून सिनेसाक्षरता संस्कार देण्याचे काम ते संपूर्ण आत्मीयतेने करीत आहेत .चित्रपट-मालिका-न्यूज चेनेल या माध्यमांमधे करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांना त्यांनी प्रशिक्षण, साहित्य, आणि संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऍक्टिंग, डायरेक्शन, एडिटिंग, स्क्रिप्ट रायटिंग आदी क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन स्वतःचं करिअर घडवलं आहे. ‘माणसाच्या माणुसकीलाच करतो आम्ही वंदन’ या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन पंकज धंदर यांचा प्रवास सिनेमा क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक – मानसिक परिवर्तन साधण्याचा एक सशक्त प्रयत्न ठरत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस अमरावतीच्या सांस्कृतिक वर्तुळातून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.