ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

एअर इंडियाचं विमान मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर घसरलं, सर्व प्रवासी सुरक्षित

कोचीहून मुंबईला आलेल्या एअर इंडियाचं विमान हे विमानतळावरील धावपट्टीवरून घसरले. सुदैवानं कोणताही अपघात झाला नाही.

 

 

 

मुंबई – अहमदाबादमधील एअर इंडियाच्या अपघाताच्या आठवणी अजूनही ताज्या असताना आज एअर इंडियाचा अपघात थोडक्यात टळला आहे. कोचीहून मुंबईला जाणारे एअर इंडियाचे विमान – AI 2744 A320 (VT-TYA) हे मुसळधार पावसात आज मुंबई विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरले. सुदैवानं सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून (सीएसएमआयए) सांगण्यात आली.

विमान धावपट्टीवरून घसरल्यानंतर धावपट्टीच्या कच्च्या जागेवर वळले. परंतु ते पुन्हा धावपट्टीच्या पक्क्या पृष्ठभागावर आले. धावपट्टीला किरकोळ नुकसान झाल्याची नोंद आहे. विमान जमिनीवर उतरण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी दुय्यम धावपट्टी (१४/३२) सक्रिय करण्यात आली आहे. विमान सुरक्षितपणे गेटवर पोहोचले असून विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स उतरले आहेत. विमान तपासणीसाठी ग्राउंड करण्यात आलं आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे एअर इंडियानं म्हटलं आहे.

संसदेत एअर इंडियाच्या अपघाताचा प्रश्न उपस्थित- दरम्यान, अहमदाबादमधील एअर इंडियाच्या अपघाताबाबत नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी संसदेत माहिती दिली. अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया 171 विमान अपघाताची विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ‘निष्पक्ष आणि पारदर्शक’ चौकशी करत असल्याची त्यांनी संसदेत माहिती दिली. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटना आणि एएआयबी, विषय तज्ञ हे अपघाताची सखोल चौकशी करत आहे. अंतिम चौकशी अहवालाची प्रतिक्षा करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

विदेशी माध्यमांना पायलट संघटनेची नोटीस- अहमदाबाद विमान अपघाताच्या कारणाबाबत घाईघाईनं कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचं अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळानं (NTSB) म्हटले आहे. एनटीएसबीनं माध्यमांमध्ये सुरू असलेल्या अटकळ अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. काही परदेशी माध्यम संघटनांनी विमान अपघातासाठी पायलटला जबाबदार धरले आहे. त्यामुळे फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सने वॉल स्ट्रीट जर्नल आणि रॉयटर्सना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. एअर इंडियाच्या अपघातासाठी कोणत्याही तथ्याशिवाय पायलटला जबाबदार धरल्याचा संघटनेनं आरोप केला आहे. फेडरेशनने म्हटलं आहे की, या घटनेची चौकशी अजूनही सुरू आहे. मग अहवालाशिवाय असे वृत्तांकन का केले जात आहे?

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.