ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

फुटबॉल पंढरी कोल्हापुरात वर्ल्डकप फिव्हर शिगेला; मेस्सीसह रोनाल्डोचे पेठा-पेठांमध्ये लागले फ्लेक्स

फुटबॉल पंढरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरात फुटबॉलचे जगप्रसिद्ध खेळाडू मेस्सीसह रोनाल्डोचे पेठा-पेठांमध्ये फ्लेक्स लागले आहेत. हे सामने पाहण्यासाठी चौकाचौकामध्ये स्क्रीन लावण्यात येणार आहेत.

कोल्हापूर– देशभरात आयपीएलसह विविध क्रिकेट स्पर्धांदरम्यान क्रिकेटप्रेमींचा नेहमीच उत्साह दिसून येतो. क्वचितच इतर क्रीडा स्पर्धांबाबत क्रीडाप्रेमींची उत्सुकता आणि उत्साह दिसून येतो. मात्र, कोल्हापूर शहर त्याला अपवाद आहे. फुटबॉलची विश्वचषक आजपासून सुरू होत असताना शहरातील फुटबॉलप्रेमींचा उत्साह दिसून आला.

चार वर्षांनी येणारा फुटबॉलचा महाकुंभ फिफा विश्वचषक स्पर्धा आजपासून अमेरिका, मेक्सिको, कॅनडा या देशांमध्ये खेळवली जाणार आहे. तब्बल 48 देश, 104 सामने या स्पर्धेदरम्यान खेळले जाणार आहेत. यासाठी जगभरातील फुटबॉल शौकिनांमध्ये उत्साहवर्धक वातावरण पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातही मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, जुना बुधवार पेठ या पारंपारिक पेठांमधील फुटबॉल प्रेमी विश्वचषकासाठी सज्ज झाले आहेत.

कोल्हापुरातील मंगळवार पेठेत असणाऱ्या गुलाब गल्लीत चॅलेंज ग्रुपच्या सदस्यांनी संपूर्ण गल्लीत प्रत्येक देशाचे झेंडे आणि फुटबॉल खेळाडूंचा फोटो पताका करून गल्लीला सजावट केली आहे. फुटबॉल विश्वचषक जरी प्रत्यक्ष पाहायची संधी मिळत नसली तरी मनमुराद फुटबॉल प्रेम करून आपल्या आवडत्या खेळाडूला क्रीडा नगरी कोल्हापुरातून आम्ही पाठिंबा देत आहोत. फुटबॉल आमच्यासाठी खेळ नसून आमच्या भावना आहेत. यातूनच नव्या पिढीला खेळाकडे आकर्षित करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे, असे प्रथमेश फडतरे यांनी सांगितलं.

 

रोनाल्डो, मेस्सी, नेमार साठीच आम्ही बघतो-कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून दरवर्षीचा फुटबॉल हंगाम सुरू होतो. यासाठी कोल्हापूर शहरातील तालमी आणि पेठांचे संघ सहभागी होतात. हे सामने पाहण्यासाठी लक्षणीय गर्दी स्टेडियमवर पाहायला मिळते. यासोबतच पेठमध्ये जगभरातील अनेक देशांच्या प्रसिद्ध खेळाडूंचे फॅन्स क्लब आहेत. पोर्तुगालचा प्रसिद्ध खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो, अर्जंटीना संघाचा खेळाडू लिओनल मेस्सी आणि ब्राझीलचा नेमार या खेळाडूंची कट्टर चाहते कोल्हापुरात पाहायला मिळतात. या तिन्हीही प्रसिद्ध खेळाडूंचा हा शेवटचा वर्ल्डकप असल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या खेळाडूंसाठीच आपण फुटबॉल सामने पाहतो, अशी प्रतिक्रिया मंगळवार पेठेतील फुटबॉलप्रेमी प्रणव फडतरे यानं व्यक्त केली.

 

कोल्हापुरात मुलीही फुटबॉलच्या चाहत्या- फुटबॉल सामन्यात प्रत्येक क्षणाला रोमहर्षक ठरणाऱ्या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी हजारो फुटबॉल शौकीन स्टेडियमवर हजेरी लावतात. यामध्ये आता मुलींची ही संख्या लक्षणीय आहे. कोल्हापुरात ही पाटाकडील तालीम मंडळ, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, खंडोबा तालीम, शिवाजी तरुण मंडळ, वेताळ तालीम आणि बालगोपाल जुना बुधवार तालीम या फुटबॉल मंडळांसह चाहत्यांमध्ये मुलींचाही समावेश आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असलेल्या मुलीही आता वेळ काढून फुटबॉलचे सामने पाहण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या फुटबॉलचे सामने आम्ही एकत्र कुटुंबांच्या सदस्या सोबत पाहणार असल्याचा निश्चय मंगळवार पेठेत राहणाऱ्या श्रावणी हिर्लोस्कर आणि श्वेशा शेळके यांनी केला आहे.

सेमी फायनल फायनलला चौका-चौकात होणार स्क्रीनिंग- आजपासून सुरू होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 19 जुलैपर्यंत खेळवल्या जाणार आहेत. कोल्हापूर शहरातील अनेक तालमी आणि मंडळाकडून सेमी फायनल आणि फायनल सामन्यांचं स्क्रीनिंग चौकांमध्ये केलं जाणार आहे याची. तयारीही सध्या सुरू आहे. तसेच आजपासून फुटबॉलविषयी चषक सुरू होणार असल्यानं लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानं आवडत्या खेळाडू आणि देशाची जर्सी खरेदी करण्यासाठी खेळांच्या दुकानांमध्ये गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. या आठवड्यात अर्जेंटिना, ब्राझील आणि पोर्तुगाल या देशांच्या खेळाडूंचे टी-शर्ट घेणाऱ्यांची मागणी वाढली असल्याचं कोल्हापुरातील विक्रेते शिवम माने यांनी सांगितलं. एकूणच आजपासून फुटबॉलचा महाकुंभ अमेरिका, कॅनडा, मेक्सिको देशात होत असला तरी याचा फीवर कोल्हापुरातही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia