महाराष्ट्र

पूराच्या संकटाला तोंड देण्यासाठी प्रशासनाची सज्जता; मालखेड तलावावर बचावकार्याचे थरारक प्रात्यक्षिक

-अमरावती  (जिल्हा प्रतिनिधी) : आगामी पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या पूरस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी अमरावती जिल्हा प्रशासनाने आपली तयारी अधिक बळकट केली असून त्याचाच एक भाग म्हणून चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड तलाव परिसरात जिल्हास्तरीय पूर आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम उत्साहात पार पडली. या उपक्रमातून आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांनी कशा पद्धतीने समन्वय साधून नागरिकांचे प्राण वाचवावेत, याचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आशिष येरेकर यांच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या सराव मोहिमेत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) नागपूर, जिल्हा शोध व बचाव पथक तसेच विविध शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग नोंदविला. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रंगीत तालीमीत पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढणे, त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणे, तसेच दुर्घटनाग्रस्त भागात शोध आणि बचाव कार्य कसे राबविले जाते याचे वास्तवदर्शी सादरीकरण करण्यात आले.

पूरामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांची पूर्वतयारी, जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना, तसेच ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती याबाबत उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्याची यंत्रणा यांचाही आढावा घेण्यात आला.

या प्रात्यक्षिकादरम्यान स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष तलावाच्या पाण्यात उतरून धाडसी बचावकार्याचे सादरीकरण केले. त्यांच्या साहसी सहभागामुळे उपस्थितांना आपत्तीच्या काळात आवश्यक असणाऱ्या तत्परतेची आणि समन्वयाची जाणीव झाली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय पथके आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पावसाळ्यापूर्वी आयोजित करण्यात आलेली ही रंगीत तालीम जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या सज्जतेचा प्रभावी नमुना ठरली असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश यातून अधोरेखित झाला.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia