आरोग्यताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

आरोग्यशास्त्र व आहारशास्त्रावर अमरावती मध्ये एक दिवशीय शिबिर

 

अमरावती:- बदलत्या जीवनशैलीमुळे मनुष्याची आहार पद्धती बदलली आहे. यामुळे माणसाला वेगवेगळे आजार जडू लागले आहेत. आरोग्यशास्त्र व आहारशास्त्र या बाबतीत योग्य माहिती लोकांना समजावी म्हणून ‘वाॅव अकादमीचे फ्रेन्ड्स क्लब अमरावती’ यांच्या वतीने अभियंता भवन, शेगाव नाका चौक, अमरावती येथे रविवार दिनांक 1 जुन 2025 रोजी एक दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वीरांगना झांसी च्या महारानी लक्ष्मीबाई यांचे सहावे वंशज, मर्मथेरपी, नाळी परिक्षण तसेच उपवास आणि अन्न औषध संशोधक आहार तज्ज्ञ योग गुरू, जागतिक व्याख्याते श्री. वैभव दादा साठे हे इंदौर वरुन अमरावती करांना विशेष मार्गदर्शन करायला येत आहेत.
आज समाजात प्रत्येक घरात कुठल्या न कुठल्या आजाराने प्रवेश केलेला आहे. शुगर ,BP, अस्थमा, संधिवात, थाॅयराईड, डोळ्यांचे आजार, किडनीचे आजार, डोकेदुखी, पाठदुखी, पायदुखी, कंबरदुखी, दातदुखी, मनकेदुखी, किडनीचे विकार, सिकलसेल पासून तर कॅन्सर सारख्या दुर्धर आजारा पर्यंत आपल्याला लांब कसं राहता येईल. आपल्याला दवाखाने नेहमी साठी करावे लागतील का…? गोळ्या, औषध आयुष्यभर खावे लागतील का…? गोळ्यांनसोबत आपलं आयुष्य संपेल का…? की आपण या गोळ्या बंद करून सुद्धा आपल्याला आयुष्यात जगण्याचा आनंद घेता येईल का…? आपल्या घरच्या आहाराला व पाण्यालाच औषध म्हणून कसं वापरता येईल. यावर प्रामुख्याने श्री वैभव दादा सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. सुर्य नाडी, चंद्र नाडी, जल चिकित्सा, भारतीय योग, मर्मथेरपी,अशा एक ना अनेक विषयांवर या एक दिवसीय शिबीर मध्ये दिवसभर मार्गदर्शन चालणार आहे.
या शिबिरात कोणीही सहभागी होवू शकते. मात्र नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्यांना या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे. त्यांनी सौ. अश्विनी वितोंडे-खान मो. नंबर – 9766096906, तसेच सौ. सारिका शिवाजी कोकाटे मो. नंबर 7775989948 या क्रमांकावर संपर्क करावा व अधिक माहिती घेऊन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवू शकता.
या कार्यक्रमाचे आयोजनासाठी आझाद जमा खान, शिवाजी कोकाटे, राहुल दहातोंडे, किर्ती दहातोंडे, भुषण साबळे, भावना काळे, अमोल भोजने, सुचिता भोजने, किशोर आमले, मुकुंद भक्ते, पुजा भक्ते, मंगेश मानकर, श्रद्धा मानकर, अशोकरावजी जीवरकर, स्वाती बहेकर, आदीं परिश्रम घेत आहे. अमरावती वासियांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.