ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

भटक्या कुत्र्यांमुळे मुंबईत झाली होती दंगल; जाणून घ्या काय आहे इतिहास?

मुंबईत कुत्र्यांमुळे 1832 मध्ये झालेली दंगल ही बॉम्बे डॉग रायट्स अथवा बॉम्बे रॉयट्स म्हणूनदेखील ओळखली जाते. जाणून घ्या, इतिहास

मुंबई- भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरून सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाची संपूर्ण देशात चर्चा झाली. त्यानिमित्त प्राणीप्रेमी आणि भटक्या कुत्र्यांना विरोध करणाऱ्या नागरिकांची सोशल मीडियात मतमतांतरे दिसून आली. यावरून भटक्या कुत्र्यांचा विषय किती संवेदनशील आहे, याची अनेकांची खात्री पटली. पण, मुंबईत भटक्या कुत्र्यांमुळे दंगल झाली होती, हे तुम्हाला माहित आहे का? एवढंच काय, अत्यंत शांत समुदाय मानला जाणारा पारशी समुदायदेखील रस्त्यावर उतरला होता. हीच गोष्ट तुम्हाल आज आम्ही सांगणार आहोत.

मुळात केवळ व्यापार करण्यासाठी आलेल्या इंग्रजांनी आपली सत्तेची मूळ भक्कम करण्यासाठी मुंबईच्या व्यापारी समुदायांना संरक्षण आणि व्यावसायिक प्रोत्साहन दिली. त्यासाठी सहकार्य करण्याचं धोरण केले. त्याचा फायदा मुंबईमधील पारशी समाजाला मिळाला होता. त्याचमुळे 1826 पर्यंत मुंबईत सुमारे दहा हजार लोक राहत होते, अशी इतिहासात नोंद आहे. या पारशी समुदायाला इंग्रजांनी आपलसं केलं होतं.काय होतं दंगलीचं कारण? मुंबईत कुत्र्यांमुळे 1832 मध्ये झालेली दंगल ही बॉम्बे डॉग रायट्स अथवा बॉम्बे रॉयट्स म्हणूनदेखील ओळखली जाते. त्यावेळी कुत्र्यांना मारण्यासाठी सरकारनं बक्षीस देण्याची घोषणा केल्यानंतर केलेल्या पारशी लोकांनी आंदोल केल्यानंतर दंगल उसळली होती. इंग्रजांनी कुत्र्यांना संपविण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं धोरण स्वीकारल्याचं पारशी समाजाला रुचलं नव्हतं. कारण, पारशी समाजामध्ये कुत्र्यांना पवित्र मानलं जात असल्यानं त्यांनी इंग्रजांच्या निर्णयाला विरोध केला.

 

ETV Bharat / state

भटक्या कुत्र्यांमुळे मुंबईत झाली होती दंगल; जाणून घ्या काय आहे इतिहास? – BOMBAY DOG RIOTS HISTORY

मुंबईत कुत्र्यांमुळे 1832 मध्ये झालेली दंगल ही बॉम्बे डॉग रायट्स अथवा बॉम्बे रॉयट्स म्हणूनदेखील ओळखली जाते. जाणून घ्या, इतिहास

Bombay dog riots

बॉम्बे डॉग रायट्स (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 26, 2025 at 3:05 PM IST

3 Min Read

मुंबई- भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरून सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाची संपूर्ण देशात चर्चा झाली. त्यानिमित्त प्राणीप्रेमी आणि भटक्या कुत्र्यांना विरोध करणाऱ्या नागरिकांची सोशल मीडियात मतमतांतरे दिसून आली. यावरून भटक्या कुत्र्यांचा विषय किती संवेदनशील आहे, याची अनेकांची खात्री पटली. पण, मुंबईत भटक्या कुत्र्यांमुळे दंगल झाली होती, हे तुम्हाला माहित आहे का? एवढंच काय, अत्यंत शांत समुदाय मानला जाणारा पारशी समुदायदेखील रस्त्यावर उतरला होता. हीच गोष्ट तुम्हाल आज आम्ही सांगणार आहोत.

मुळात केवळ व्यापार करण्यासाठी आलेल्या इंग्रजांनी आपली सत्तेची मूळ भक्कम करण्यासाठी मुंबईच्या व्यापारी समुदायांना संरक्षण आणि व्यावसायिक प्रोत्साहन दिली. त्यासाठी सहकार्य करण्याचं धोरण केले. त्याचा फायदा मुंबईमधील पारशी समाजाला मिळाला होता. त्याचमुळे 1826 पर्यंत मुंबईत सुमारे दहा हजार लोक राहत होते, अशी इतिहासात नोंद आहे. या पारशी समुदायाला इंग्रजांनी आपलसं केलं होतं.

Stray Dogs and Social Unrest in India

जिल्हानिहाय भटक्या कुत्र्यांची संख्या (Source- ETV Bharat Graphics)

काय होतं दंगलीचं कारण? मुंबईत कुत्र्यांमुळे 1832 मध्ये झालेली दंगल ही बॉम्बे डॉग रायट्स अथवा बॉम्बे रॉयट्स म्हणूनदेखील ओळखली जाते. त्यावेळी कुत्र्यांना मारण्यासाठी सरकारनं बक्षीस देण्याची घोषणा केल्यानंतर केलेल्या पारशी लोकांनी आंदोल केल्यानंतर दंगल उसळली होती. इंग्रजांनी कुत्र्यांना संपविण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं धोरण स्वीकारल्याचं पारशी समाजाला रुचलं नव्हतं. कारण, पारशी समाजामध्ये कुत्र्यांना पवित्र मानलं जात असल्यानं त्यांनी इंग्रजांच्या निर्णयाला विरोध केला.

Stray Dogs and Social Unrest in India

जिल्हानिहाय भटक्या कुत्र्यांची संख्या (Source- ETV Bharat Graphics)

नेमकी कशी झाली दंगल? 1832 मध्ये, इंग्रजाची सत्ता असलेल्या मुंबईतील पोलीस दंडाधिकाऱ्यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. अधिकाऱ्यांनी उपद्रवी आणि सार्वजनिक ठिकाणी धोका होत असल्यानं कुत्र्यांना मारण्याचा निर्णय घेतला. एवढचं नव्हेतर मारल्या जाणाऱ्या प्रत्येक कुत्र्यासाठी बक्षीस देण्याचा निर्णय घेतला. या बक्षिसापोठी अनेक लोकांनी आक्रमक नसलेले कुत्रेदेखील मारण्यास सुरुवात केली. बक्षिसापोटी एकप्रकारे स्पर्धाच सुरू झाल्याप्रमाणं काही जणांनी घरात घुसून पाळीव कुत्रेदेखील मारले. घरातील पाळीव कुत्रेदेखील सरकारच्या निर्णायमुळे सुरक्षित नसल्यानं पारशी समुदायात नाराज झाली. कुत्र्यांना मारण्याकरिताचा अवधी हा वाढविण्यात आल्यानं पारशी समुदायाच्या नाराजीत आणखीनं भर पडली. कारण, पारशी समाजातील पवित्र दिवसातदेखील कुत्र्यांना ठार होणार होते. कुत्र्यांना मारण्यासाठी बक्षीस देण्याचा कायदा लागू केल्यानंतर भटक्या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात हत्या झाली. त्याचबरोबर खासगी पाळीव कुत्र्यांची हत्या झाल्यानंतर पारसी समुदाय हा संतापला. पारशीनी कुत्रे पकडणाऱ्यांना विरोध केला.झोरोस्ट्रियन धर्मात हे कुत्रे जीवन आणि मृत्यूच्या उंबरठ्याचे पवित्र रक्षक मानले जातात. त्यामुळे कुत्रे मारण्याच्या धोरणाकडं पारशी समुदायानं अत्यंत अपमानजनक म्हणून पाहिलं. त्याचाच परिणाम म्हणून 6 जून 1832 रोजी दंगल झाली.मुंबईतील लोकांनी इंग्रजांना दाखविला होता हिसका- पारशी समुदायातील लोकांनी आक्रमक होत व्यवसाय बंद ठेवले. शहरातील बाजारपेठ आणि व्यवसाय बंद झाल्यानं शहरात अराजकता निर्माण झाली. पारशी समुदायाची मुंबईतील व्यवसायावर कमालीची पकड असल्यानं इंग्रज सरकारला झुकावं लागलं. त्यांनी पारशी समुदायातील प्रतिष्ठित नेत्यांशी वाटाघाटी करून निर्णय बदलला. भटक्या कुत्र्यांना दिसताच ठार मारण्याऐवजी शहराबाहेर हलविण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील लोकांनी विशेषतः पारशी समुदायातील लोकांनी इंग्रजांना जनमत किती प्रभावी असते हे दाखवून दिले.

भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानं काय दिले होते निर्देश- भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं स्वयंदखल घेत 11 ऑगस्टला महत्त्वाचे निर्देश दिले होते. देशात सरासरी 20 हजार कुत्रे चावण्याच्या घटना नोंदवल्या जातात. त्यापैकी 2 हजार घटना दिल्लीत दररोज घडतात, याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आश्चर्य व्यक्त केलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली आणि एनसीआरच्या रस्त्यांवरून भटक्या कुत्र्यांना लवकरात लवकर हटवण्याचे निर्देश दिले होते. भटक्या कुत्र्यांना हटविण्याला विरोध करण्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला दाखल करण्याचा इशारा सर्वोच्च न्यायालयानं दिला. भटक्या कुत्र्यांच्या पुनर्वसनाला विरोध करणाऱ्या प्राणीप्रेमींनादेखील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं फटकारले. रेबीजमुळे मृत्यू झालेल्यांचे जीव परत आणणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सर्वोच्च न्यायालयानं सुधारित आदेश काय दिले?सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिल्लीतील सर्व भटके कुत्रे निवारागृहात हलविण्याच्या निर्णयावर देशभरात प्राणीप्रेमींनी टीका केली. तसेच राजकीय नेत्यांनी हा निकाल अव्यवहार्य असल्याचं म्हटलं. या प्रकरणात सर्वोच्च निकालाच्या दुसऱ्या खंडपीठानं केवळ रेबीज किंवा आक्रमक वर्तन असलेल्या कुत्र्यांना निवारागृहात पाठविण्याचे आदेश दिले. तसेच सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालण्यास बंदी लागू केली. भटक्या कुत्र्यांशी संबंधित सर्व प्रलंबित प्रकरणाबाबत राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.