ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

कांटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन; वयाच्या 42 व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास

कांटा लगा या गाण्यानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं मुंबईत निधन झालं. वयाच्या 42 व्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतला.

मुंबई : कांटा लगा या गाण्यानं प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं निधन झालं आहे. वयाच्या 42 व्या शेफाली जरीवाला हिनं मुंबईत अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या धक्क्यानं शेफाली जरीवाला हिचं निधन झाल्याची माहिती तिच्या निकटवर्तीयांनी दिली. याबाबत सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनीही सोशल माध्यमांवर पोस्ट शेयर करुन दु:ख व्यक्त केलं आहे.

शेफाली जरीवालाचं हृदयविकारानं निधन : शेफाली जरीवाला हिला गुरुवारी रात्री उशीरा हृदयविकाराचा झटका आला. यावेळी तिचा पती पराग त्यागी यानं तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिचा मृत्यू हृदविकाराच्या धक्क्यानं झाल्याचं तिच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. मात्र मृत्यूच्या नेमक्या कारणाविषयी तिच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही. दरम्यान शेफाली जरीवालाचा मृत्यू झाल्यानं मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

कांटा लगा गाण्यानं आली होती प्रकाशझोतात : शेफाली जरीवाला ही अभिनेत्री 2002 या साली आलेल्या कांटा लगा या गाण्यानं प्रकाशझोतात आली होती. कांटा लगा अल्बन रिलीज होताच शेफाली जरीवाला हिला रातोरात मोठी प्रसिद्धी मिळाली. कांटा लगा हे गाणं सगळ्यांच्या पसंतीला उतरलं. त्यातही या गाण्यात शेफाली जरीवाला हिचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावला. त्यासह शेफाली जरीवाला ही बीग बॉस 13 या रियालिटी शोमध्येही झळकली होती. दरम्यान अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं मुंबईत हृदयविकारानं निधन झाल्यानं तिचा पती पराग त्यागी याला मोठा धक्का बसला आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.