ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

आंबोली कावळेसाद पॉईंटवरील खोल दरीत पर्यटक बेपत्ता

आंबोलीत पर्यटनासाठी आलेला कोल्हापूर येथील तरुण चारशे फूट खोल दरीत बेपत्ता झालाय. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. शोध मोहीम शनिवारी राबवण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग – आंबोली कावळेसाद येथे पर्यटनासाठी आलेला कोल्हापूर येथील राजेंद्र बाळासाहेब सनगर (45 चिले काॅलनी, कोल्हापूर) हा पर्यटक चारशे फूट खोल दरीत बेपत्ता झालाय. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. दरीत कोसळलेल्या तरुणाच्या शोधासाठी पोलीस तसंच गेळे ग्रामस्थांकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही. दरम्यान ही शोध मोहीम शनिवारी राबवण्यात येणार आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषद मधील अधिकारी आणि कर्मचारी असे मिळून 19 जण आंबोली येथे वर्षा पर्यटनाला आले होते. सकाळी हे सर्व पर्यटक आंबोली मुख्य धबधब्यावर होते. तर दुपारनंतर हे सर्व पर्यटक कावळेसाद पॉईंट येथे आले होते. हे सर्व पर्यटक कावळेसाद पॉईंट येथे फोटोग्राफी करत असतनाच राजेंद्र सनगर हे कावळेसाद पॉईंट येथील दरीच्या बाजूला असलेल्या रेलिंगला पाठ करून उभे असतनाच त्यांचा अचानक तोल जाऊन खाली दरीत कोसळले.

या घटनेनंतर सोबत असलेल्या इतरांनी धावाधाव केली. तसंच तेथील दुकानदारांनी देखील लागलीच पोलिसांना माहिती दिली. पोलीस तसेच गेळे ग्रामस्थ यांनी उशिरापर्यंत शोध मोहीम राबवली, पण तो तरुण सापडला नाही. त्यामुळे ही शोधमोहीम आता उद्या शनिवारी राबविण्यात येणार आहे. या घटनेचा अधिक तपास आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस करीत आहेत.

 

वर्षा पर्यटनाच्या निमित्ताने एक दोन दिवस सुट्टी मिळाली की हल्ली लोक जवळच्या पर्यटन स्थळी जातात. मात्र त्या ठिकाणी सुरक्षेची योग्य काळजी ते घेत नसल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. त्यामुळे अनेकदा धबधबा तसंच धरणाच्या ठिकाणी तरुणांचे करुण अंत झाल्याची उदाहरणं आहेत. तरीही असे प्रसंग वारंवार घडत आहेत. त्यामुळे प्रशासन तसंच पोलिसांनी पर्यटकांना काळजी घेण्याच्या सूचना यानिमित्तानं दिल्या आहेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.