महिनाभर नुसतेच ढगाळ, पावसाचा ‘खो’

अमरावती : ऑगस्टमध्ये महिनाभर ३६ फक्त ढगाळ वातावरण राहिले. या ३० दिवसांत २६८ मि.मी. पावसाची सरासरी आवश्यक असताना फक्त मि.मी. पाऊस पडल्याने ८३ टक्के पावसाची तूट राहिली, त्यामुळे वाढीवर तसेच फुलोऱ्यावर असलेली पिके तहानली आहेत. शिवाय ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीड व रोगांचा अटॅक झाल्याने सरासरी उत्पादनात कमी येणार आहे.
पावसाळ्याच्या १२० पैकी ९० दिवस संपले म्हणजेच ७५ टक्के पावसाळा संपला आहे. त्या तुलनेत जिल्ह्यात ४० टक्के पावसाची तूट आहे. सर्वच तालुक्यात पाऊस माघारल्याने खरीप हंगाम धोक्यात येऊन आगामी काळात पाणीटंचाईचे चटके बसणार आहेत. जून ते ऑगस्ट या कालावधीत ६९०.१ मि.मी. सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ ४१०.४ मि.मी. (५९.५ टक्के) पाऊस झाला आहे.
1)चार तालुक्यांनी वाढवली चिंता जून ते सप्टेंबरची एकूण सरासरी ८६२.० मि.मी. आहे, परंतु आतापर्यंत केवळ सरासरी ४१०.४ मि.मी. (४७.६ टक्के) पाऊस झाला आहे.
2)ऑगस्ट महिन्यात मोर्शी (१०.७ टक्के), अचलपूर (१०.९ 3 टक्के), धामणगाव (१०.७ टक्के) आणि चांदूर रेल्वे (११.९ टक्के) या तालुक्यांत पावसाची अत्यंत बिकट परिस्थिती राहिल्याने चिंता वाढली आहे.
पिकांवर गंभीर परिणाम ऑगस्टच्या काळात पिकांना वाढीसाठी पाण्याची अत्यंत गरज असते. मात्र, महिनाभरात झालेल्या अत्यल्प पावसामुळे (१३.८ टक्केच) सोयाबीन, कपाशी, तूर व मूग यासारखी खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. तर अचलपूर, चिखलदरा, भातकुली आणि वरुड या तालुक्यांत कमी पावसाने पिकांचे सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पाऊस लांबल्याने पिकांची वाढ खुंटली असून, उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे.

