ताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र

व्हेंटिलेटर कंपन्याच राज्य सरकारला आणताहेत व्हेंटिलेटरवर : अरविंद सावंत

डफरीन अग्निकांड घडलेल्या रुग्णालयाची खासदार, आमदारांसह पाहणी

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयाची इतकी सुसज्ज अशी इमारत आहे आणि तेथे अशा प्रकारची घटना घडणे हे दुर्दैवी आहे. या घटनेत व्हेंटिलेटरचा स्फोट झाला. त्यामुळे व्हेंटिलेटर कंपन्याच सरकारला व्हेंटिलेटरवर आणताहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे आरोग्यमंत्र्यांनी व्यक्तिशः लक्ष देण्याची गरज आहे. जर इमारतीवर इतका खर्च होतो, तर येथे आवश्यक मूलभूत सुविधांकडे सरकार लक्ष देण्याची गरज असल्याचे उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केले.

जिल्हा स्त्री रुग्णालय येथील एसएनसीयूमधील अग्निकांडानंतर आता सत्ताधारी व विरोधकांच्या एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. रविवारी उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी रुग्णालयाची सुसज्ज इमारत पाहून त्यांनी कौतुक केले. मात्र अशा सुसज्ज इमारतीमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेचा देखील त्यांनी निषेध नोंदविला.

सरकारमध्ये जी काही एल-१ कंत्राटदाराकडून वस्तू खरेदी करण्य जी गडबड आहे, त्यामुळे क्वॉलिटी में होत नाही. केवळ वास्तू उभारून चाल नाही तर रुग्णालयातील आवश्यकते सरकारने लक्ष देण्याची गरज असल् खासदार सावंत म्हणाले. यावे उद्धवसेनेचे आमदार गजानन लवटे, स सूर्यवशी, पराग गुडधे, बाळा तळोव प्रतिभा बोपशेट्टी आदी उपस्थित होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.