महत्वाचे

अमरावतीत राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात; 300 खेळाडूंचा उत्साह

अमरावती : राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा (वयोगट 14 वर्ष मुलं/मुली) सन 2025-26 याची अमरावती येथे जोरदार सुरुवात झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा 15 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून, महाराष्ट्रातील आठही विभागांमधील 16 मुलांचे व 16 मुलींचे असे एकूण 300 स्पर्धक, पंच, अधिकाऱ्यांसह सहभागी झाले आहेत.

मुलांच्या गटातील सामने सायन्सकोर मैदानावर तर मुलींचे सामने पोलिस क्रीडांगणावर सकाळ व दुपारच्या सत्रात सुरू झाले आहेत.

सायन्सकोर क्रीडांगणावर झालेल्या उद्घाटन सोहळ्यात जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गजानन कोटुरवार, नितीन चव्हाळ, अरुण जयस्वाल, रविभाऊ कर्वे, सुशिल सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन झाले. राष्ट्रीय खेळाडू दिपाली आरोळे यांनी क्रीडाशपथ दिली तर जोएल बांगर यांच्या क्रीडाज्योतीने मशाल प्रज्वलित करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी जाधव यांनी केले. संचालन मुख्याध्यापक संदीप इंगोले यांनी तर आभार संजय कथळकर यांनी मानले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.