ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

शालेय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सीताबाई संगई कन्या शाळेच्या मुलींचा विजय

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : शालेय तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा 2025-26 शेवंताबाई काळमेघ विद्यालय, चौसाळा येथे दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत 14, 17 व 19 वर्षे वयोगटातील तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला होता.

17 वर्षे वयोगटातील मुलींच्या गटात सीताबाई संगई कन्या शाळेच्या संघाने उत्कृष्ट खेळ सादर करत अंतिम फेरी गाठली. त्यांनी ज्ञानपीठ हायस्कूल, शेवंताबाई काळमेघ विद्यालय, निर्मला हायस्कूल कापूस तळणी या संघांना पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत महात्मा फुले विद्यालय, विहिगाव संघाचा पराभव करून विजेतेपद मिळवले.

या स्पर्धेत अक्षरा अरबाड, जिया तायडे, शाश्वती भोंग, पूर्वा वडतकर, दर्शना खारोडे, आनंदी मोरे, साची कोंडे, रिद्धी वाकोडे, सिद्धी वाकोडे या विद्यार्थिनींनीं संघासाठी अप्रतिम खेळ करत योगदान दिले. त्यापैकी अक्षरा अरबाड व जिया तायडे या सर्वोत्तम रेडर ठरल्या.

या विजयानंतर सर्व स्तरातून विद्यार्थिनींचे कौतुक होत असून, सीताबाई संगई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अविनाश संगई, उपाध्यक्ष डॉ. उल्हास संगई, सचिव विवेक संगई, सहसचिव प्रसाद संगई, अजय संगई, सदस्य आशिष संगई तसेच सर्व संचालक, मुख्याध्यापक उत्तमराव मुरकुटे, पर्यवेक्षिका नीलिमा सांगोळे आणि शिक्षक-शिक्षिका यांनी खेळाडू मुलींचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या संघाला कन्या शाळेचे शारीरिक शिक्षण शिक्षक समाधान शेटफळकर यांचे मार्गदर्शन लाभले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.