दर्यापूर शहर व तालुक्यात आरटीई अर्तंगत;१३७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित, ०२ जागा रिक्त

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर : तालुक्यात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के जागा दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गातील मुलांसाठी राखीव असतात. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी, १४ जानेवारी २०२५ पासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
आरटीई कोट्यातून होत असलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या पाचव्या प्रतीक्षा फेरीनंतर दर्यापूर तालुक्यातील १५८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने आरटीईच्या ०२
जागा रिक्त आहेत. यंदा आरटीई प्रवेशाच्या ५ प्रवेश फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीत १५८ जणांची निवड यादी लागली होती. ९ जूनपर्यंत पालकांना प्रवेश निश्चित करावे लागणार होते. आरटीई कायद्यांतर्गत गरीब गरजू मुलांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत शाळांमध्ये शिक्षण घेता यावे. यासाठी पहिल्या वर्गातील प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के प्रवेश आरटीईच्या कोट्यातून देण्यात
येतात. २०२५-२६ मध्ये तालुक्यात आरटीई प्रक्रियेला गती मिळाली आणि १६ जूनपर्यंत १५८ प्रवेशापैकी १५६ विद्याथ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले. पण काहींनी वेळेत प्रवेश घेतला नसल्याने जागा रिक्त राहिल्या आहेत. या कारणांमुळे जागा रिक्त पालकांच्या अपेक्षेप्रमाणे घराजवळील शाळा न मिळणे, शाळा अपेक्षेप्रमाणे मिळूनही ऑनलाइन अर्जात नमूद केलेला रहिवासी पुरावा देता आला नाही. ऑनलाइन अर्जात भरलेली रहिवासी प्रामणपत्रांसह विविध कागदपत्रे पालकांना देता आली नाहीत. पंचायत समिती स्तरावर कागदपत्रे छाननीवेळी अनेकांना अर्जातील कागदपत्रे देता आली नाहीत. अर्ज भरण्याबाबत पुरेशी माहिती नसल्याने रिक्त जागा राहिल्या आहेत.
-१५६ जणांची निवड, वेळोवेळी पालकांना आवाहन.
आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबवण्यात आली होती. आरटीई अंतर्गत तालुक्यातील १५८ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यासाठी पालकांना वेळोवेळी आवाहन केले होते. पंचायत समिती स्तरावर कागदपत्र छाननी नंतर प्रवेशाच्या पत्रानंतर तालुक्यातील १५६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
– संतोष घुगे, प्रभारी. गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती दर्यापूर

