महाराष्ट्र

“लोकशाहीच्या चौकटीला लागलेली झळ : तक्रारीने निवडणूक चित्रच ढवळले”

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी –नगरपरिषद निवडणूक २०२५ ची रणधुमाळी सुरू होत असतानाच AIMIM चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनीत डोंगरदिवे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक अधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करून राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.

डोंगरदिवे यांनी घराघर संपर्क मोहिमेच्या पुराव्यांची मनमानी तपासणी, दस्तऐवज पडताळणीत पक्षपातीपणा, नामांकन प्रक्रियेत अडथळे आणि प्रचार परवानग्यांवरील अतिरिक्त शुल्क अशा अनेक अनियमिततेचे आरोप केले आहेत.

न्यायालयीन आदेशाकडे दुर्लक्ष झाल्याचाही त्यांनी ठोस उल्लेख केला असून, यामुळे निवडणूक प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास ढासळत असल्याचे नमूद केले आहे.

त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बदली, पारदर्शक निवडणूक प्रक्रिया आणि नियमानुसार कार्यवाहीची मागणी केली आहे.

या तक्रारीमुळे अंजनगाव सुर्जीच्या निवडणुकीत नवे वादंग पेटण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.