ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

श्री क्षेत्र सावंगा विठोबा नगरीत श्रावण मास मांड

अखंड-भजन शुभारंभ, अमावास्येनिमित्त चंदन उटी

चांदूर रेल्वे प्रतिनिधी चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानमध्ये गुरुवार, २४ जुलै रोजी पहाटे ५ वाजता श्रावण मास मांडची सुरुवात लहान मंदिरात ढाल बसवून मुख्य मंदिरात महाराजांच्या गणाने विश्वस्त मंडळ आणि भाविकांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. तसेच दुपारी ४ वाजता संस्थानच्या वतीने अमावस्या निमित्त चंदन उटी उत्सव आयोजित केला आहे.

या कार्यक्रमासाठी बाहेर गावावरून आलेल्या भक्तांसाठी संस्थानच्या वतीने अन्नदान समितीच्या नियंत्रणात महाप्रसादाचे आयोजन केले आहे. श्रावण मास मांडीमध्ये बाहेर गावातील अवधूत भजन मंडळांचा दैनंदिन सहभाग राहणार आहे. त्याकरिता संस्थानच्या वतीने २४ जुलै ते २४ ऑगस्ट या कालावधीचे भजन पाळीचे नियोजन तयार केले आहेत. यात सहभागी भजन मंडळांकरिता अवधूत संस्थानच्या वतीने चहा, नाश्ता आणि भोजन व्यवस्था केली आहे. तसेच श्रीफळ देऊन मंडळांचा सत्कार आणि नवीन सहभागी मंडळांना महाराजांची गाथा भेट देण्यात येणार आहे.

भाविकांसाठी दररोज दुपारी १२ ते १.३० आणि रात्री ८ ते ९.३० या वेळात प्रसादाचे वितरित करण्यात येणार आहे. याकरिता संस्थानचे प्रसादालयात प्रसाद देणगी पावती घेऊन भाविकांनी प्रसादाचा लाभघ्यावा. तसेच संस्थानमध्ये इच्छुक अन्नदान दात्यांना देणगी देऊन अन्नदान करता येईल. याकरिता संस्थानशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल, विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रवीण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी व विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia