ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र
सुनील यावलीकर यांना ‘कलासर्जन’ पुरस्कार जाहीर

अमरावती : नागपूर येथील डॉ. गिरीश गांधी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारे ‘धीरोदात्त महिला’ व ‘कलासर्जन’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. कलासर्जन पुरस्कारासाठी अमरावतीचे नामवंत चित्रकार, लेखक सुनील यावलीकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. २५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. नागपूर येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल येथे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कराडचे प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते पुरस्काराचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर वितरण होईल. विभागाचे माहिती आयुक्त गजानन निमदेव राहतील.

