ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 ची आवृत्ती भारतात लॉंच, जाणून घ्या किंमत

टीव्हीएस मोटरनं भारतात 2025 अपाचे आरटीआर 160 लॉंच केली. जी यांत्रिक सुधारणा, नव्या पॉवरट्रेन आणि आकर्षक डिझाइनसह 1.34 लाखांपासून उपलब्ध आहे.

हैदराबाद : टीव्हीएस मोटर कंपनीनं भारतात आपली लोकप्रिय मोटरसायकल अपाचे आरटीआर 160 ची 2025 आवृत्ती लॉंच केली आहे. या नव्या मॉडेलची सुरुवातीची किंमत 1.34 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात यांत्रिक सुधारणा, पॉवरट्रेनमध्ये बदल आणि आकर्षक डिझाइन अपडेट्स आहेत. हे बदल बाजाज पल्सर एनएस160, यामाहा एफझेड-एस यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मोटरसायकलची स्थिती मजबूत करण्यासाठी करण्यात आले आहेत. नव्या वैशिष्ट्यांसह आणि आधुनिक तंत्रज्ञानासह ही मोटरसायकल बाजारात लॉच झालीय.

वैशिष्ट्ये आणि डिझाइन
टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 ची 2025 आवृत्तीमध्ये हेडलॅम्पचे अनोखे डिझाइन असून तीची स्पोर्टी बॉडी तिला आकर्षक बनवते. टँकच्या दोन्ही बाजूंना शरुड्स, सिंगल-पीस सीट आणि टेल सेक्शन डिझाइनळे ती स्टायलिश दिसते. मॅट ब्लॅक आणि पर्ल व्हाइट रंगसंगतीसह लाल रंगाचे अलॉय व्हील्स तिला आणखी आकर्षक बनवतात.

वैशिष्ट्ये
या मोटरसायकलमध्ये पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, जे स्मार्टएक्सॉननेक्टद्वारे ब्लूटूथ आणि व्हॉइस असिस्टसह कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये प्रदान करतं. यात टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, लीन अँगल मोड, कॉल आणि एसएमएस अलर्ट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय, रायडरच्या विविध गरजांसाठी स्पोर्ट, अर्बन आणि रेन असे तीन रायडिंग मोड्स उपलब्ध आहेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.