ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

सुकळी (ता. दर्यापूर) येथील भूस्खलनग्रस्त भागाची आमदार गजानन लवटे यांनी केली पाहणी

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर : तालुक्यातील सुकळी गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जमीन खचून भूस्खलनाची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतीसह गावाची मोठी जमीन या भूस्खलनात गेली आहे.

आज या स्थळाला आमदार गजानन लवटे यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी उपविभागीय अधिकारी, दर्यापूर यांना तातडीने आवश्यक ती मदत व उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

या पाहणीवेळी खासदार बळवंत वानखडे, बाळासाहेब हिंगणीकर, उपविभागीय अधिकारी हांडे, तहसीलदार रवींद्र कानडजे, तसेच सुकळी गावाचे सरपंच, ज्येष्ठ नागरिक, स्थानिक नेते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार लवटे यांनी प्रशासनाला गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पुनर्वसन, आर्थिक मदत व नुकसानभरपाईची कार्यवाही हाती घेण्याच्या सूचना दिल्या.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.