ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

ओम इंटरनॅशनल ज्युनिअर सायन्स कॉलेज अँड कोचिंग अंजनगाव सुर्जीचा यशाचा ठसा

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : येथील ओम इंटरनॅशनल ज्युनिअर सायन्स कॉलेज अँड कोचिंग चे विद्यार्थी विविध उच्च शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आहेत.

कॉलेजमधील विद्यार्थी सार्थक विजय पेंडोखरे याची गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, परभणी येथे एमबीबीएस या उच्च वैद्यकीय शिक्षणाकरिता निवड झाली आहे. त्याचबरोबर कु. सोनल ताळे आणि चि. आदित्य भास्कर या दोन्ही विद्यार्थ्यांची गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, अमरावती येथे निवड झालेली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री. दिनेशजी भोंडे, कोषाध्यक्ष श्री. जितेंद्र कटारमल, सौ. सोनल कटारमल, प्राचार्या डॉ. पूजा हनवंते तसेच प्रा. वैभव साखरे, प्रा. डॉ. कुणाल देशमुख, प्रा. पंकज बानाईत, प्रा. आदित्य ब्राह्मणकर, प्रा. निलेश गोमासे, प्रा. सौ. वैशाली ताडे, श्री. दिनेश अस्वार व सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या यशामुळे ओम इंटरनॅशनल ज्युनिअर सायन्स कॉलेज अँड कोचिंग अंजनगाव सुर्जीचे शैक्षणिक कार्य आणखी उज्ज्वल ठरले आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.