सामाजिक कार्यकर्ते अनिल शामलालजी गौर यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : स्व. पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त प्रसन्न मंगल कार्यालय अंजनगाव सुर्जी येथे भारतीय जनता पार्टीतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सेवा पंधरवाडा अंतर्गत “एक पेड मा के नाम” वृक्षारोपण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रदर्शनी तसेच माहितीपटाचे सादरीकरण या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. नागरिक, कार्यकर्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार मा. प्रभूदासजी भिलावेकर यांनी भूषविले. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. दिनेशजी सूर्यवंशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मा. शिवराजजी कुलकर्णी (प्रदेश प्रवक्ता), मा. सौ. निवेदिता ताई दिघडे (प्रदेश कार्यकारिणी सदस्य), मा. रमेशजी बुंदिले (माजी आमदार), मा. सुधीरजी रसे (जिल्हा महामंत्री), मा. सौ. नयनाताई जोशी (जिल्हा महामंत्री), मा. सदाशिव खडके (जिल्हा महामंत्री), मा. गोपालजी चंदन (जिल्हा महामंत्री), डॉ. विलास कविटकर (जिल्हा संयोजक), श्याम गंगराळे व सुनील खानझोडे (सहसंयोजक)मनीष मेण शहराधक्ष्य, पंकज श्रीवास्तव उपशहराध्यक्ष, उमेश भोंडे माजी शहराधक्ष्य,मनोज श्रीवास्तव माजी शहर सरचिटणीस आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते अनिल शामलालजी गौर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जंगी जाहीर प्रवेश केला. त्यांच्या सोबत राजेश मोहन गौर, चेतन संजय गौर,गजानन गाढवे,संतोष गुलाबराव पवार, ओम शैलेश पवार, गोकुल चिंतामण गौर, कांतीलाल कहार, दीपक कहार, योगेश गौर, सागर गौर, बबलु गौर, सचिन गौर, गणेश गौर, दुर्गेश गौर, कृष्णा गौर, विलास घेणे, निखिल गौर, अंकित गौर, राजेंद्र कहार, जय गौर, संतोष गौर, आनंद गौर,रोहित शिवा गौर,आकाश गौर, यश मंडवे, संदीप गौर, विशाल गौर, राजेश गौर, अजय सातोटे, योगेश घेणे, अभिजीत ढेंबरे, शुभम जाधव, रवी गौर, अतुल गौर, सागर गौर, रोहित गौर, राजेंद्र कहार, अंकितगौर, निखिल गौर, जय गौर, प्रीत कहार, रोहित गौर, अविनाश गौर, राजेश गौर, प्रकाश गौर,नितीन गौर,शेखर भाऊ गौर,अस्विन बर्वे यांच्यासह असंख्य युवकांनी पक्षप्रवेश केला.
या प्रवेशामुळे अंजनगाव सुर्जी व परिसरातील भाजप संघटनेला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष प्रभूदासजी भिलावेकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. तर अनिल गौर यांनी पक्षाच्या विचारधारेनुसार समाजसेवा व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त केला.
गौर यांच्या प्रवेशामुळे भाजपला शहरी भागात नवी ताकद लाभून आगामी राजकीय समीकरणांवर सकारात्मक परिणाम होईल, असे चित्र दिसून येत आहे.

