ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

अंजनगाव सुर्जी येथे बाप्पाला उत्साहात निरोप, पोलिस बंदोबस्तामुळे मिरवणुका सुरळीत

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव व सुर्जी शहरातील गणपती विसर्जन मिरवणुका ६ व ७ सप्टेंबर रोजी उत्साहात व जल्लोषात पार पडल्या. अंजनगावमधील मिरवणुकीची सुरुवात पान अटाई येथून तर सुर्जीत मोठी मळी येथून करण्यात आली. डाॅल्बी, ढोल-ताशे, बॅंड पथक व पारंपरिक वाद्यांच्या गजरात भक्तांनी बाप्पाला निरोप दिला.
अंजनगावमधील मिरवणुकीत तब्बल ३९ गणेश मंडळांचा सहभाग होता. मार्गात मोमीनपुरा, संत गुणवंत बाबा चौक, संगत संस्थान, सराफा लाईन आदी ठिकाणांचा समावेश होता.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेषतः संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष ठाकरे, पोलीस निरीक्षक सुरज बोंडे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिरवणुकीवर सतत लक्ष ठेवले.
नागरिकांच्या सहकार्यामुळे व पोलिसांच्या दक्षतेमुळे दोन्ही शहरांतील विसर्जन मिरवणुका शांततेत व यशस्वीरित्या संपन्न झाल्या.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.