ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

पावसाळ्यात ट्रॅकिंगला जाताना सोबत मीठाची पिशवी का ठेवावी?

तज्ञांच्या मते, ट्रॅकिंगला जाताना मीठ सोबत ठेवणे अनेक कारणांसाठी उपयुक्त ठरू शकते. या बातमीद्वारे मीठ सोबत ठेवणे का महत्त्वाचे आहे ते जाणून घेऊया.

 

 

Tips For Safe Trekking: पावसाळा सुरु होताच तरूणाई, ट्रॅकर्स आणि निसर्गप्रेमी ट्रॅकिंगचा आनंद घेतात. पावसाळ्याच्या दिवसांमधील हिरव्यागार टेकड्या आणि हवामान ट्रेकिंगसाठी उपयुक्त असते. हा काळ ट्रॅकिंगसाठी खूप चांगला मानला जातो. पावसळ्यात निसर्गप्रेमींना निर्गाचं सौंदर्य जवळून पहायला मिळते.पावसाळ्यात ट्रेकिंग म्हणजे साहस आणि पर्यावरणाचा आनंद घेणे. सोबतच ट्रॅकिंगमध्ये अनेक आव्हाने असतात, ज्यात रस्ते, भूस्खलनाचा धोका, जास्त आर्द्रता, अप्रत्याशित हवामान आणि कीटक यांचा समावेश आहे. अशावेळी काही अनुचित घडू नये म्हणून काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. विशेषतः डोंगराळ आणि जंगली भागात कीटक आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत, तज्ञ म्हणतात की ट्रेकिंग करताना मीठ सोबत ठेवणे खूप महत्वाचे आहे. जाणून घेऊ ते का?

  • ट्रॅकिंग म्हणजे काय? ट्रॅकिंग म्हणजे डोंगराळ आणि दुर्गम भागातून पायी प्रवास करणे. ट्रॅकिंगमध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासाठी विविध आव्हानात्मक मार्गांवरून चालत जावं लागते. ट्रॅकिंग ही एक एक एडव्हेंचर एक्टिव्हिटी आहे. ज्यामध्ये नैसर्गिक वातावरणात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी वन्य भागात किंवा दऱ्या खोऱ्यात चालत जातात. आणि खडकाळ डोंगर आणि भूप्रदेश, दऱ्या, किल्ले इत्यादी दृश्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक दिवस घालवतात. हे हायकिंग आणि चालण्याच्या क्रियाकलापांचे संयोजन आहे. परंतु जर तुम्ही पावसाळी हवामानात किंवा वर्षावनांमध्ये ट्रॅकिंग करत असाल तर काही गोष्टींबद्दल तुम्हाला खूप काळजी घेणे आवश्यक आहे.

जळू आणि कीटकांपासून बचाव: ट्रॅकिंग करताना जळू किंवा इतर कीटकांपासून स्वत:च संरक्षण करण्यासाठी मीठाचा वापर केला जावू शकतो. जर कीटकांवर मीठ घातलं तर ते त्वचेपासून लगेच वेगळे होतात, ज्यामुळे चावण्याचा आणि कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

 

  • मिठाचा पुरवठा: जास्त घामामुळे शरीरातून मीठ कमी होते. असं म्हटलं जातं, की मिठाचे सेवन केल्याने शरीरातील पाणी आणि मीठाचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. मिठाचा वापर इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास आणि थकवा कमी करण्यास देखील फायद्याचे ठरू शकते.
  • नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती: मीठ नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्वचेच्या संसर्गास प्रतिबंध करते.

इतर उपयुक्त गोष्टी: ट्रॅकिंगला जाताना नेहमी पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी, नकाशा, कंपास, बॅटरी टॉर्च इत्यादी सोबत ठेवावे. तसेच बॅगेत सुकामेवा, काजू, फळे इत्यादी हलके आणि ऊर्जा देणारे पदार्थ ठेवा. शक्य असल्यास प्लास्टिकच्या पिशव्या टाळा आणि कापडी पिशव्या किंवा कंटेनर वापरा.

 

  • ज्या भागात ट्रॅकिंगकरिता जायचं आहे त्या भागातील वातावरणाची पुरेपूर माहिती द्या. तसंच त्या भागातील पावसाचा अंदाज पाहून ट्रॅकिंगचे नियोजन करणं कधीही चांगलं.
  • जर तुम्ही रात्रीच्यावेळी ट्रॅकिंग करत असाल तर फुल-शर्ट-पॅन्ट घालणे बंधनकारक आहे. कारण यामुळे किटकांच्या डंखापासून तुमचा बचाव होऊ शकतो.
हेही वाचा

  1. पावसाळ्यात ट्रिप प्लॅन करताय? महाराष्ट्रातील ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वोत्तम
  2. फक्त 400 रुपयामध्ये फिरा गोवा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

शिलाँगच्या ‘या’ धबधब्याची का होतेय चर्चा? जाणून घ्या भारतातील 6 धोकादायक आणि सुंदर धबधब्यांचं रहस्य

  1. पावसाळ्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहेत ही ठिकाणं
  2. कमी बजेटमध्ये ट्रिप प्लॅन करताय? भारतील हे ठिकाणं आहेत ‘पॅाकेट फ्रेन्डली’
  3. भारतातील ‘हे’ रस्ते पाहण्यासारखे आहेत, विलंब न करता करा नियोजन
शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.