ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटातील अभिनेत्री झायरा वसीमचा झाला निकाह, फोटो शेअर करून केला आनंद व्यक्त…

२०१९ मध्ये झायरा वसीमनं चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. आता तिनं निकाह करून सर्वांना आश्चर्यचकित केलंय.

मुंबई : ‘दंगल’ फेम माजी अभिनेत्री झायरा वसीमचा आता निकाह झाला आहे. २०१९ मध्ये झायरा चित्रपटसृष्टी सोडून गेली होती. ती चित्रपटसृष्टीपासून दूर एकाकी जीवन जगत होती. आता तिनं तिच्या लग्नाचे फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. झायरानं तिच्या पतीबरोबरचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. झायरानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर निकाहमधील फोटो शेअर करत अभिनंदन व्यक्त केला आहे. झायरानं लग्नाच्या फोटोंमध्ये तिचा किंवा तिच्या पतीचा चेहरा दाखवला नाही, मात्र ती निकाहच्या प्रमाणपत्रावर सही करताना दिसत आहेत.

झायरा वसीमचा झाला निकाह : झायरा आणि तिच्या पतीचे व्हायरल झालेले फोटोंना सोशल मीडियावर असंख्य लाईक्स मिळवत आहेत. या फोटोंवर प्रतिक्रिया देऊन अनेकजण तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान शेअर केलेल्या फोटोंमध्ये झायराचे सुंदर मेंदी लावलेले हात आणि तिच्या लग्नाची अंगठी दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये झायरा तिच्या पतीबरोबर बसली असून ती कॅमेऱ्याकडे पाठ करून आहे. आता झायरानं तिचे नवीन आयुष्य सुरू केले आहे. एका चाहत्यानं तिच्या पोस्टवर लिहिलं आहे, ‘निकाह मुबारक चुऊ बहना.’ दुसऱ्या एकानं लिहिलं आहे, ‘तुम्हा दोघांचेही अभिनंदन.’ आणखी एकानं लिहिलं, ‘तुमच्या दोघांना पण खूप खूप प्रेम अभिनंदन.’ याशिवाय अनेकजण या पोस्टवर हॉर्ट इमोजी देऊन प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

 

झायरा वसीमबद्दल : दरम्यान झायरानं २०१६ मध्ये आलेल्या आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात आमिर खानची मुलगी कुस्तीगीर गीता फोगटची भूमिका साकारली होती. ‘दंगल’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. २०१७ मध्ये, झायरानं पुन्हा एकदा आमिर खानबरोबर धमाल केली. आमिरनं तिला त्याच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटात घेतलं, या चित्रपटानं देखील खूप कमाई केली. २०१९ मध्ये, झायरानं सोशल मीडियावर चित्रपटसृष्टीतून बाहेर पडण्याची घोषणा करून तिच्या चाहत्यांना एक आश्चर्यचा धक्का दिला. आता ती साधारण आयुष्य जगत आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.