महाराष्ट्र

लोकहिताला प्राधान्य देणारे नेतृत्व! सुयोग खाडे यांच्या पाणपोई उपक्रमाची शहरात जोरदार चर्चा

सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिकांचे हाल होत असतानाच अंजनगाव सुर्जी शहरातील संगई नाका परिसरात सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत गटनेता तथा नगरसेवक सुयोग खाडे मित्र परिवाराच्या वतीने अत्याधुनिक थंड आरओ पाणपोई सुरू करण्यात आली. या लोकहितवादी उपक्रमामुळे प्रवासी, कामगार, विद्यार्थी, रिक्षाचालक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संगई नाका हा शहरातील गजबजलेला भाग असल्याने येथे दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते. प्रखर उन्हात तहानलेल्या नागरिकांना शुद्ध व थंड पाणी सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने उभारण्यात आलेली ही आरओ पाणपोई सध्या नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


यावेळी बोलताना गटनेता तथा नगरसेवक सुयोग खाडे यांनी जनसेवेलाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. “सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन पुढील काळातही विविध सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.


या प्रसंगी प्रशांत ठाकरे, गजानन लेंधे, प्रशांत गोंडचोर, प्रशांत आकर्ते, डॉ. कुकडे, विनोद पारडे, म्हसाळ सर, राहुल मोपारी सर, सतीश कोल्हे, मुस्ताक भाई, पत्रकार अशोक पिंजरकार, सचिन अब्रुक, विनोद चोपळे, अनंत मानकर आणि अशोक बहिरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


उपस्थितांनी सुयोग खाडे यांच्या जनहितवादी भूमिकेचे कौतुक करत हा उपक्रम शहरासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. उन्हाच्या कडक झळांमध्ये नागरिकांना मोफत थंड व शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाची शहरभर सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.