ताज्या घडामोडीदेश विदेशफॅशनमहत्वाचे

आयएफएसच्या दालनात गोंधळ कर्मचाऱ्याविरुद्ध केली तक्रार

वनविभागात नेमके चालले तरी काय? वनकर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने महिला अधिकाऱ्याचा अपमान केल्याचा ठपका

अमरावती : सध्या वन विभाग अतिशय संवेदनशील बनले असून, संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने अमरावती मुख्य वनसंरक्षकाच्या दालनात गोंधळ घातला. एवढेच नव्हे तर महिला आयएफएस अधिकाऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. या घटनेने वनविभागात एकच खळबळ उडाली असून, अमरावती वनविभागात नेमके चालले तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

गत काही वर्षापूर्वी आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर अनेक महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठीण प्रसंग ओढावला होता. आता तर महिला आयएफएस यांच्या दालनात घुसून शिवीगाळ आणि धमकी देण्याचा प्रकार घडला आहे. पोलिस सूत्रांनुसार, २१ मे रोजी अमरावतीच्या मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी या कॅम्प स्थित कार्यालयात शासकीय कामकाज करीत असताना प्रवीण गाढवे नामक एक कर्मचारी कोणतीही परवानगी न घेता मद्यधुंद अवस्थेत तो बॅनर्जी यांच्या दालनात घुसला. अशोभनीय भाषा आणि अर्वाच्च वर्तन करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. या घटनेची तक्रार मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील तांत्रिक सहायक आशिष मोळेकर यांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात केली आहे. मध्यंतरी एका बोगस कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी असलेल्या एका वनरक्षकाने महिला आरएफओचे हनन केल्याप्रकरणी त्याचे निलंबन करण्यात आले आहे. ही घटना ताजी असतानाच याच संघटनेशी संबंधित प्रवीण गाढवे नामक कर्मचाऱ्याने अर्वाच्च भाषेत महिला आयएफएसला शिवीगाळ केल्याचे प्रकरण घडले.

 

गाडगेनगर पोलिस निरीक्षक घटनास्थळी प्रवीण गाढवे याने महिला आयएफएसच्या दालनात घुसून गोंधळ घालून अपमान केल्याप्रकरणी गाडगेनगरचे निरीक्षक ब्रह्म गिरी हे घटनास्थळी दाखल झाले. प्रवीण गाढवे पोलिसांसमोर विभागीय वन अधिकारी किरण पाटील यांच्याशी असभ्य वर्तणूक करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी राज्य महिला आयोगावर ताशेरे ओढण्यात आले आहे. तर दुसरीकडे मेळघाटातील महिला आरएफओला त्रास होत असल्याप्रकरणी निलंबित वनरक्षक आणि ‘त्या’ संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या विरोधात लेखी तक्रार महिला आयोगाकडे पाठविण्यात आली. मात्र, या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून पोलिसांना कोणतेही आदेश दिले नसल्याबाबत वन विभागातील महिलांमध्ये प्रचंड नाराजी वर्तवली जात आहे.

 

‘त्या’ कर्मचारी संघटनेचा सहभाग काही दिवसांपासून येथील सीसीएफ कार्यालयासमोर एका संघटनेचे उपोषण सुरू होते. हे आंदोलन गैरमार्गाने आणि विनापरवानगीने सुरु होते, असे पोलिस तक्रारीत नमूद आहे. सीसीएफ जयोती बॅनर्जी यांच्या दालनात घुसून गाढवे याने गोंधळ घातला. हा प्रकार आंदोलनाला पाठिंबा असलेल्या त्या कर्मचारी संघटनेमुळे होत असल्याचे नमूद आहे. कर्मचारी संघटनेच्या नावे काही पदाधिकारी वरिष्ठांना दबाव आणतात संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करावी, अशी मागणी रेंजर्स असोसिएशनने केली आहे. या प्रकरणी चौकशी स्थापन होणार असल्याची माहिती आहे.

 

मी स्वतः घटनास्थळी पोहोचलो होतो. सीसीएफ कार्यालयातून झालेला घटनाक्रम एका अर्जाद्वारे २५ मे रोजी पाठविला आहे. खरे तर कोणी तरी समक्ष येऊन संबंधिताविरुद्ध तक्रार नोंदविणे आवश्यक आहे. त्यानंतरच गुन्हा नोंदविला जाईल.

ब्रह्म गिरी, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.