महाराष्ट्र

जिल्हास्तरीय ‘युनिटी पदयात्रा’ उत्साहात पार; सरदार पटेलांच्या 150व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती : भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘सरदार @150’ अभियानांतर्गत आज जिल्हास्तरीय ‘युनिटी पदयात्रा’ मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात उत्साहात आयोजित करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, महानगरपालिका अमरावतीचे उपआयुक्त नरेंद्र वानखेडे, तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता देशमुख यांच्या उपस्थितीत झाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारी पथनाट्ये व सांस्कृतिक नृत्ये सादर केली. उपस्थितांनी ‘आत्मनिर्भर भारत’ घडविण्याची शपथही घेतली.

यानंतर मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवत पदयात्रेला प्रारंभ केला. मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयातून सुरू झालेली पदयात्रा इर्विन चौक मार्गे पुन्हा महाविद्यालयात पोहोचली.

या उपक्रमात मेरा युवा भारत अमरावती, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महानगरपालिका, शिक्षण व क्रीडा विभाग, तसेच एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक, होमगार्ड, भारत स्काऊट-गाईड, विविध शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकवृंद आणि हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia