आरोग्यटेक्नॉलजीताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

मे महिन्यात 22 दिवसांपासून सतत पाऊस, जून महिन्यात मुसळधार – पाऊस

अमरावती : मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस विदर्भातील सर्वच जिल्ह्यात सुरू आहे. उन्हाचा महिना असणाऱ्या मे महिन्यात अमरावती जिल्ह्यात सलग २२ दिवसांपासून अवकाळी पाऊस विविध भागात कोसळत असताना जून महिन्यात मान्सून दाखल झाल्यानंतर संपूर्ण भारतात जून महिन्यात सरासरीपेक्षा १०६ टक्के अधिक पाऊस बरसणार, असं श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या हवामान विभागानं स्पष्ट केलंय.

पावसाचं बदललं चक्र : “मान्सूनआधी केरळमध्ये दाखल व्हायचा यानंतर कोकणात आणि मुंबईत पोचल्यावर मध्य महाराष्ट्र आणि पुढे विदर्भातून थेट गोंदिया जिल्ह्यापर्यंत तो सक्रिय व्हायचा. यावर्षी मात्र, जूनमध्ये सक्रिय होणारा मान्सून मे महिन्यातच केरळामध्ये सक्रिय झालाय. असं असलं तरी अमरावती जिल्ह्यासह विदर्भात सध्या जो पाऊस कोसळतो आहे तो अवकाळी पाऊस आहे. अमरावती शहरात मंगळवारी दुपारी ४ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. परंतु, यावेळी लगतच्या चांदूर बाजार तालुक्यात मात्र, पाऊस झाला नाही. चांदूर बाजारसमोरच्या अचलपूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असून ज्या ठिकाणी ढग जमले त्या ठिकाणी तो कोसळतो आहे,” अशी माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील कृषी तज्ञ प्रा. राजेंद्र पाटील यांनी दिली.

सध्या पेरणी नाही : “आता मान्सूनपूर्व शेतात पेरणीच्या कामाची लगबग सुरू होते. यावर्षी सतत अवकाळी पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांची काम खोळंबलीत. मान्सून दाखल झाल्यावर १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करण योग्य नाही. जे शेतकरी जिरायती शेती करतात ते जमिनीत चांगलं पाणी मुरल्याशिवाय पेरणीची घाई करणार नाहीत, अशी माहिती प्रा. राजेंद्र पाटील यांनी दिली.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.