ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

स्व. माणिक पोदार लर्न स्कूल, वाढोणा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थी व शिक्षकांनी केली योगासने!

रिसोड : दि. 21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन भारतासह महाराष्ट्रात देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून शाळेच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी सुद्धा योगासने केले आहेत. या कार्यक्रमासाठी शाळेच्या वतीने मोठी तयारी देखील केली होती. योग दिनामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या शारीरिक कौशल्याचे सादरीकरण यावेळी दिसून आले.आपल्या भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा आणि योग, योगासने त्याचबरोबर योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून योगाचे महत्त्व त्याचे फायदे आणि योगासनाची गरज पटवून दिलेली आहे.

विद्यार्थ्यांनी जाणून घेतले आपल्या जीवनातील योगाचे महत्व!

 

शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक व भावनिक यांचे संतुलन नीट राहण्यासाठी योगासने करणे खुप गरजेचे आहे. कारण आजच्या या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण सर्वजण आपले शरीर तंदरूस्त ठेवू शकतो. शिवाय मनावरही चांगले संस्कार करतात येतात. त्यात योगा करणे म्हणजे एकत्र येणे होय. तर या योगा दिनाची सर्वात प्रथम सुरूवात ही आपल्या भारतात झाली, जो आजच्या घडीला आज संपूर्ण जग साजरा करत आहे. जागतिक स्तरावर या महान वारशाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने, दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यावेळी शाळेतील क्रीडा शिक्षक अजय भालेराव यासोबतच शाळेतील शिक्षक भास्कर टापरे, निवेदिता जोशी यांनी सुद्धा विविध प्रकरातील योगासने करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आपल्या जीवनात योगाचे महत्त्व सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन तसेच दैनंदिन परिपाठ वर्ग 4 थी च्या विदयार्थ्यांनी केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.