ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

कृषीतज्ज्ञ वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय अमरावतीच्या विद्यार्थिनींनी दिला गावकऱ्यांना “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश.

अमरावती (प्रतिनिधी) श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी माहुली जहागीर येथे वृक्षरोपण सोहळा महाराष्ट्र कृषी दिना निमित्त साजरा केला.

राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या स्मरणार्थ कृषी दिन साजरा केला जातो. भारतीय आधुनिक कृषी क्षेत्रात वसंतराव नाईक यांचे अमूल्य योगदान आहे.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणजे झाड आपली मित्र. हो खरच, वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. मानवाची सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा सहभाग आहे. वृक्ष केवळ आपलेच जीवन प्रभावित करतात असे नव्हे, ते तर आपले अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी संजीवनी प्रदान करतात. प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करणारा वृक्ष आजही मानवी जीवन आणि समाजाच्या अस्तित्वाच्या संदर्भात महत्वाची भूमिका बजावीत आहे. मानवाला त्याच्या दैनंदिन जीवनात गरजेच्या सर्व गोष्टी अगदी निरपेक्ष हेतूने वृक्ष देतात.
या प्रसंगी ग्रामपंचायत येथे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ प्रितीताई बरडे उपस्थित होत्या.
शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित व डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला द्वारा सलग्न श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय येथील विद्यार्थीनी क्रिष्णा पाटील, मुस्कान मुराई, कोमल बोरीवार, वंशीका देशमुख, खुशी उपरीकर,समृद्धी सगणे,अंजली मोहोड, सुहानी लोहकरे,साक्षी धुमाळे, पुजा निकम, सुहानी ठाकरे यांचा समावेश होता.

हा संपूर्ण उपक्रम श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय चे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर देशमुख यांच्या नेतृत्वात प्रा. सौ मिरा ठोके, प्रा. प्रहेश देशमुख, प्रा. अर्चना झालटे, प्रासौ कल्पना कुऱ्हाडे, प्रा. सौ शितल डगवार, प्रा. डॉ निरज निस्ताने आणि प्रा. मयूर गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न करण्यात आला

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.