अक्षर मानव राज्य कार्यकारिणीची बैठक उत्साहात संपन्न; महाराष्ट्रातील कथा कादंबरीकार, लेखक राजन खान यांची आवर्जून बैठकीत उपस्थिती


-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती:- महाराष्ट्र अक्षर मानव राज्य कार्यकारिणीची बैठक महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध मराठी लेखक, कथा, कादंबरीकार अक्षर मानवचे विश्वस्त राजन खान यांच्या उपस्थितीत कमल शांती पॅलेस, घाट रोड, चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे दिनांक 28 व 29 जुन 2025 रोजी महाराष्ट्र भरातिल मुख्य पदाधिकारींच्या उपस्थित दोन दिवस बैठक उत्साहात संपन्न झाली.
निर्मळ आणि भेदमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आणि मानवी समाजाची सर्व व्यवस्था बदलली पाहिजे माणसं सरळ, नैतिक मार्गाने चालली पाहिजे या साठी राज्यभरातील काम करणारी अक्षर मानवची माणसं विचार, मंथन करायला इथं एकत्र आली होती.
समाज व्यवस्था आधी दुरुस्त करावी लागेल. जगण्याची सर्वच क्षेत्रे भ्रष्ट झाली आहेत, बिघडली आहेत. ती दुरुस्त करावी लागतील. सर्वत्र प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता आणावी लागेल. जगण्याचे सर्व प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी संघटित व्हावं लागेल तेव्हाच शासन, प्रशासन, कायदा सुव्यवस्था आणि राजकारण दुरुस्त होईल. असे मार्गदर्शन प्रसिद्ध लेखक, कथा कादंबरीकार राजन खान यांनी उपस्थित मुख्य पदाधिकारींना मार्गदर्शन केले.
या बैठकीत संघटनात्मक बाबीवर चर्चा करण्यात येऊन राज्य कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणीचा विस्तार बाबत चर्चा झाली. राज्यभर चित्रपट, नाटक, साहित्य, शिक्षण, संगित, समाजसेवा, कुटुंब, पाणी, आरोग्यदायी कार्यशाळा अश्या 96 अधिक विषयात राज्यभर सतत अक्षर मानवचे संमेलन, शिबिर, कार्यशाळा, चर्चा सत्रे राज्य पातळी पासून तर गावं पातळी पर्यंत उपक्रम राबविले जातिल. असे अनेक या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आले. हे उपक्रम 5 वर्ष पुरतिल याचे नियोजन करण्यात आले. सतत हे उपक्रम राज्यभर सुरू राहतिल या साठी अक्षर मानवची मुख्य राज्य कार्यकारिणी या वर लक्ष्य ठेवून राहिलं असा ठराव सुद्धा झाला.
सर्व प्रकारचे द्वेष, अहंकार, कसलेही भेद न करता एकमेकांना मदत करता आले पाहिजे, आधार देता आला पाहिजे. माणुस म्हणून एकमेकांचा सन्मान करता आले पाहिजे. आपण खूप हुशार आहोत, समोरच्या माणसाला काहीच समजत नाही येत नाही हे न्युनगंड मनातुन काढून टाकले पाहिजे. माणसांचे प्रश्न मिटले पाहिजे. आहे तिथे अक्षर मानवचे काम सुरू करावे. कोणाची वाट पाहत बसु नका, महाराष्ट्रभर घरा घरात ‘अक्षर मानव’ पोहचवा आज गरज आहे समाजाला अश्या विचारांची असे प्रतिपादन अक्षर मानव महाराष्ट्राचे राज्य कार्यवाह आझाद खान यांनी आपल्या सहकाऱ्यांना चर्चे मधे आपले मत सुचवले.
संपूर्ण महाराष्ट्रात ‘अक्षर मानवचे होम स्टे’ माफक दरात उपलब्ध राहतील. याचे नियोजन सुद्धा करण्यात येत आहे. सध्या मुंबई, तिवसा (अमरावती जिल्हा) पुणे येथे अक्षर मानवचे काही होम स्टे सुरू करण्यात आले आहे. याची माहिती या बैठकीत देण्यात आली. लवकरच महाराष्ट्रभर कामा निमित्त ये जा करणारी मंडळी किंवा पर्यटनसाठी राज्यभर फिरणाऱ्यांना माणसांना संपुर्ण महाराष्ट्रात होम स्टे सुविधा अक्षर मानव तर्फे देण्यात येईल. असे महाराष्ट्राच्या पालकमंत्री सौ. संजिवनी राजगुरू यांनी माहिती दिली.
अक्षर मानव संघटना ईश्वर,जात, धर्म, पंथ, भ्रष्टाचार, असे सारे भेद दूर करून माणूस विचाराने सजग व्हावा. तसेच माणसांचे आयुष्य सुंदर होईल या साठी राज्यभर उपक्रम घेत राहते. असे मार्गदर्शन महाराष्ट्राचे राज्य सचिव अरुण मापारी यांनी उपस्थित लोकांना केले.
राज्य भरातिल आलेल्या अक्षर मानवचे सर्व मंडळी तसेच मुख्य पदाधिकारी यांचे स्वागत चाळीसगांवचे उद्योजक, अक्षर मानव जळगांवचे जिल्हाध्यक्ष चित्रसेन पाटील यांनी केले तसेच दोन दिवस जातिने बैठकीत हजर होते. उपस्थित सर्व अक्षर मानव पदाधिकारींची कुटूंबिय म्हणून आस्थेने ते विचारपूस करत होते.
या अक्षर मानवच्या या त्रैमासिक राज्य आढावा बैठकीसाठी ख्यातनाम लेखक राजन खान, यमुना नाखले, आझाद खान, अरुण मापारी, संजिवनी राजगुरू, तुषार अहिरे, नीलिमा शिकारखाने, संगिता फुके, गिरीश फुके, राजेंद्र माने, चित्रसेन पाटील, भूषण विसावे, प्रशांत सोनवणे, दीपक निकम, राज्य अक्षर मानवचे मुख्य कार्यकारिणीचे पदाधिकारी, पालकमंत्री, विभाग अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष आदी पदाधिकारी महाराष्ट्रभरातुन उपस्थित होते.

