ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

विठुरायाच्या ओढीने पावले निघाली वारकऱ्यांना घेऊन लालपरी धावली !

४० हजारांवर भाविकांची वारी : तिजोरीत १ कोटी ६४ लाखांची भर

अमरावती : आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने जिल्ह्यातील ४० हजार भाविक ७९६ प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविले आहे. या सेवेतून एसटी महामंडळाच्या अमरावती विभागाला सुमारे १ कोटी ६४ लाख ६३ हजार ११० रुपये उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीपेक्षा यंदा ८ हजार ९१८ एवढी भाविकांची संख्याही वाढली आहे.

आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण अमरावतीमधून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक जात असतात. या भाविक भक्तांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीने अमरावती विभागातून १७३ बसेसद्वारे ५१७ फेऱ्या सोडल्या होत्या. ३ ते १३ जुलै दरम्यान या बसमधून ४० हजार ७९६ भाविक भक्तांची सुरक्षित ने-आण करण्यात आली.

१.६४ कोटीचे उत्पन्न

अमरावती विभागाला पंढरपूर वारीमुळे यंदा सुमारे १ कोटी ६४ लाख ६३ हजार ११० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

जिल्ह्यातून किती विशेष बसेस ?

एसटी महामंडळाने अमरावती विभागातून यंदा पंढरपूर वारीसाठी १७३ एसटी बसचे नियोजन केले होते. यामध्ये अमरावतीसह विभागातील आठ आगारांतून या बस वारीसाठी धावल्यात.

किती वारकरी पंढरपूरच्या दारी ?

अमरावती जिल्ह्यातून आषाढी वारीसाठी १७३ बस धावल्या आहेत. या बसद्वारे सुमारे ४० हजार ७९६ वारकऱ्यांनी पंढरपूरला जाऊन आषाढीची वारी पूर्ण केली आहे. यंदा अमरावती विभागातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली होती.

किती किलोमीटरचा झाला प्रवास ?

एसटी महामंडळाच्या १७३ बसेसद्वारे सुमारे २ लाख ७६ हजार ६९७किलोमीटरचा प्रवास केला आहे.

कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र सेवा आषाढी वारीसाठी हजारो भाविकांना सुखरूप देवदर्शन घडवून आणण्यासाठी हजारो एसटी महामंडळाचे चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकाऱ्यांनी अहोरात्र सेवा बजाविली आहे.

 

चालक-वाहकांची उपलब्धता, गाड्यांची पुरेशी तांत्रिक तपासणी आणि सुरक्षिततेची दक्षता यावर भर दिला होता. प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बस गाड्यांची सोय केल्याने हजारो वारकऱ्यांना वेळेत आणि सुरक्षितपणे पंढरपूरची वारी करता आली.

नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.