ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रशिक्षण

ग्रामीण भागातील वर्ग अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन करा

स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थी वर्ग ११ वी च्या प्रवेशापासून वंचित शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांचे शिक्षण मंत्री व शिक्षण उपसंचालकांनकडे मागणी

नांदगाव खंडेश्वर तालुकास्तरावरील ग्रामीण भागातील वर्ग अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने करावी व स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य प्रवेश द्यावा अशी मागणी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे व विभागीय शिक्षण उपसंचालकांना निवेदन सादर करून केली.

यावर्षीपासून वर्ग ११ वी ची प्रवेश प्रक्रिया शासनाने ऑनलाइन पद्धतीने केली असून यामध्ये स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे स्थानिक नांदगाव खंडेश्वर शहरातील वर्ग १० वी मध्ये ४०० चे वर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे विज्ञान, कला, वाणिज्य या तीन विषयात प्रत्येकी ६० विद्यार्थी प्रमाणे फक्त १८० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार इतर विद्यार्थ्यांनी वर्ग अकरावीला प्रवेश घ्यावा तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला असून यापूर्वी ऑफलाइन प्रवेश प्रक्रियेत गुणवत्तेनुसार ६० विद्यार्थ्यांना प्रवेश व २० शिक्षणाधिकारी ४० शिक्षण उपसंचालक यांच्या मान्यतेनुसार १२० विद्यार्थ्यांना एका वर्गात प्रवेश मिळत असे, त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना यात प्रवेश मिळायचा परंतु ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे स्थानिक विद्यार्थ्यांची चिंता वाढली असून नांदगाव तालुक्यात विज्ञान शाखेची अनुदानित तुकडी असलेले शिवाजी महाविद्यालय हे एकमेव असून ग्रामीण भागातील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या शहरात परिस्थितीत अभावी शिकायला जाऊ शकत नाही म्हणून वर्ग ११वी ची प्रवेश प्रक्रिया अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया हि विद्यार्थ्यांन करिता डोकेदुखीची झाली असून बामध्ये अनेक तांत्रिक अडचणी जात असून यात स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेशा बंचित राहावे लागत आहे म्हणून पूर्वी प्रमाणे ऑफलाईन प्रवेश पद्धत राबवावी व स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल असे मत प्रकाश मारोटकर यांनी व्यक्त केले.

ऑफलाइन पद्धतीने राबवावी व त्यात स्थानिक विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्याने प्रवेश द्यावा अशी मागणी शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश मारोटकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केली आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.