कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे मारहाण केल्याचं सांगत सुरज चव्हाण यांनी मागितली माफी, लातूरमध्ये काय घडला राडा?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या छावाच्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लातूरमध्ये बेदम मारहाण केली. या मारहाणीचे राजकारणात तीव्र पडसाद उमटले आहेत.

मुंबई- राष्ट्रवादी सुनील तटकरे यांच्यासमोर लातूरमध्ये पत्ते फेकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या मारहाणीनंतर छावा संघटनेनं लातूरमध्ये बंद पुकारला आहे. चौफेर टीका होत असताना राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेस अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी घडलेल्या प्रकरणाबद्दल माफी मागितली आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईल फोनवर रमीचा गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. कृषीमंत्र्यांच्या त्या कृत्यामुळे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी लातूरमध्ये निदर्शने केली आहेत.

महाराष्ट्रात आता काय बघायला मिळणार आहे याची आता कल्पना करता येत नाही…

लातूर येथील विश्रामगृहात खा. @SunilTatkare यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी तिथे आले व त्यांनी कृषीमंत्र्यांनी केलेल्या कृतीबाबत तटकरे यांना जाब विचारला. यावेळी या… pic.twitter.com/vRQCDlRCpq
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) July 20, 2025

अपशब्द वापरल्यानं मारहाणीचा दावा- छावा संघटनेचे नेते विजय घाटगे तटकरे यांनी लातूरच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार सुनील तटकरे यांच्यासमोरील टेबलावर पत्ते फेकले. यावेळी त्यांनी कृषीमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काही वेळानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे विजय घाटगे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांची सुटका झाली. या हल्ल्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. घाटगे आणि छावाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात अपशब्द वापरल्यानं ही घटना घडल्याचं दावा सुरज चव्हाण यांनी केला. ते म्हणाले,” संयम गमाविल्यानंतर टोकाचं पाऊल उचललं. सत्तेत असताना आम्ही काही चुकीचे करत आहोत, असे नाही. ते घटनात्मक पद्धतीनं आंदोलन करू शकते”.
कार्यकर्त्यांना क्रूरपणे मारहाण- घटनेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेत्या रोहिणी खडसे म्हणाल्या, “महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात कधी नव्हे तेवढा हिंसाचार घडत आहे. महाराष्ट्रात काय दिसेल याची कल्पना करणं आता अशक्य होत आहे. अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना क्रूरपणे मारहाण केली. उद्या, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक म्हणतील त्यांच्या राज्यात महाराष्ट्रासारखी परिस्थिती नको आहे”:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीदेखील आहेत, त्यांना गांभीर्यानं उत्तरे देण्याची गरज आहे. त्यांनी गृह खात्यावरील नियंत्रण गमावलं आहे का? भाजपा सत्तेत असल्यानं भाजपाशी संबंधित लोक कायदा हातात घेऊ शकतात का? महाराष्ट्रातील लोकांना आता उत्तरे हवी आहेत-राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय प्रवक्ते, क्लाईड क्रॅस्टो
हिंसाचाराच्या घटनेनं सत्ताधारी अडचणीत- नुकतेच शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विधानभवनातील कँटीनमधील कर्मचाऱ्याला अन्नाचा दर्जा निकृष्ट असल्याचं सांगत मारहाण केली होती. तर विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना विधानभवन इमारतीच्या लॉबीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात शेअर केली. त्यावर कृषीमंत्री कोकाटे यांनी “रमीची जाहिरात आली होती. आपण रमी खेळत नव्हतो”, असं स्पष्टीकरण दिलं आहे. असे असले तरी विरोधकांनी कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्राला यशवंतरावजी चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचा वारसा आहे. त्यांचाच आदर्श मानून आमचे नेते अजितदादा पवार काम करतात. आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करताना महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेत आलो आहोत. मात्र अलीकडच्या काळात…
— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) July 21, 2025

सुरज चव्हाण यांनी दिलगिरी केली व्यक्त- सुरज चव्हाण यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं,” महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचा वारसा असताना त्यांचाच आदर्श मानून आमचे नेते अजितदादा पवार काम करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धक्का लागणार नाही. याची काळजी आम्ही घेत आलो आहोत. मात्र अलीकडच्या काळात आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका होत आहे. त्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संताप होता. छावा संघटना ही अन्यायाविरुद्ध लढणारी आणि आम्हाल बंधुसंघटना वाटते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे यांना निवेदन देणे किंवा त्यांच्या अंगावर पत्त्याची पाने भिरकावणं हे आम्ही समजू शकतो. परंतु तिथून निघताना संबंधितांनी आमच्या नेत्यांबद्दल अत्यंत घाणेरडे उल्लेख करीत शिवीगाळ केली. ते ऐकून कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे मारहाण केली. दुर्दैवानं ते घडून गेलं असून त्याबद्दल आम्ही जाहीर दिलगिरी व्यक्त करतो”.