आरोग्यटेक्नॉलजीताज्या घडामोडीदेश विदेशफॅशनमहत्वाचे

का साजरा केला जातो जागतिक हिपॅटायटीस दिवस जाणून घ्या थीम, महत्त्व इतिहास आणि लक्षणं

ग्लोबल हिपॅटायटीस रिपोर्ट 2024 नुसार हिपॅटायटीस संसर्गाच्या बाबतीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. वाचा सविस्तर..,

world hepatitis day 2025: दरवर्षी 28 जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिवस साजरा केला जातो. हिपॅटायटीस हा यकृताशी संबंधित एक गंभीर जीवघेणा आजार आहे. जो विशेषत: विषाणूजन्य संसर्गामुळे होतो. हा एक सायलेंट किलर आजार म्हणून ओळखला जातो. कारण आजही जगभराती लाखो लोक हिपॅटायटीस बी किंवा सी सोबत जगत आहेत. हिपॅटायटीसशी संबंधित आजारामुळे दर 30 सेंकदाला एक व्यक्ती आपला जीव गमावतो. तसंच या प्राणघातक आजारामुळे दरवर्षी 13 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. विशेष बाब म्हणजे या आजाराने जीव गमावणाऱ्या लोकांची संख्या मलेरिया, टीबी आणि एचआयव्ही यासारख्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा जास्त आहे.

 

हा दिवस नोबल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. बारूच ब्लुमबर्ग यांच्या वाढदिवासाच्या दिवशी साजरा केला जातो. त्यांनी हिपॅटायटीस बी विषाणूचा शोध लावला आणि त्यानंतर पहिली लस तयार केली. जर हिपॅटायटीसवर वेळेवर उपचार करण्यात आलं नाही तर ते यकृत सिरोसिस, यकृत निकामी किंवा यकृताच्या कर्करोग यासारख्या जीवघेण्या परिस्थितीस कारणीभूत ठरू शकते. अशापरिस्थितीत हिपॅटायटीसशी संबंधित सर्व माहिती असणे गरजेचं आहे.

 

  • इतिहास: नोबल पारितोषिक विजेते डॉ. बारुच ब्लमबर्ग यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक हेपॅटायटीस दिवस साजरा केला जातो. डॉ. बारुच यांनची 1967 मध्ये हेपॅटायटीस बी विषाणूचा शोध लावला. तसंच त्यांनी फक्त दोन वर्षात या आजारावर पहिली लस शोधून काढली. समाजातील त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना 1976 मध्ये नोबल पारितोषिक देण्यात आलं. डॉ. बारुच ब्लमबर्ग यांनी तयार केलेल्या लसीमुळे जगभरातील लाखो लोकांचा जीव वाचण्यास मदत झाली.
  • या दिवसाचे महत्त्व: लोकांमध्ये या गंभीर आजाराविषयी जागरुकता पसरवण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. तसंच लोकांना तपासणी, लसीकरण आणि आजाराची लक्षणं ओळखण्यात प्रेरित करणे जेणेकरून लोक वेळेवर त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे हा देखील यामागील उद्देश आहे. हा एक गंभीर आजार असला तरी रुग्णाची वेळेवर तपासणी आणि उपचार केल्यास त्याला वाढण्यापासून थांबवता येवू शकते.
  • यंदाची थीम: दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर जागतिक हिपॅटायटीस दिवस सेलिब्रेट केला जातो. लेट्स ब्रेक इट डाउन या थीमवर यंदाचा हिपॅटायटीस दिवसा साजार केला जाणार आहे.

लक्षणं

  • थकवा आणि अशक्तपणा
  • कावीळ ( त्वचा आणि डोळे पिवळे होणे)
  • ओटीपोटात वेदना
  • भूक न लागणे
  • वजन कमी होणे
  • मळमळ उलट्या
  • गडद लघवी
  • ताप
  • खाज सुटणे
  • पोटदुखी
शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.