ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

अंजनगाव सुर्जी येथे श्री चक्रधर स्वामी यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : टाकरखेड नाका, येथील श्री. द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर येथे महानुभाव पंथाचे संस्थापक श्री. चक्रधर स्वामी यांच्या जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला.हया सोहळ्याला आमदार गजानन लवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी आमदार गजानन लवटे यांनी श्री चक्रधर स्वामी यांच्या आध्यात्मिक कार्याचा गौरव करत, त्यांचे विचार आणि शिकवण आजच्या पिढीला सद्भावना, सेवा आणि समत्वाचे धडे देतात, असे त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
या कार्यक्रमा प्रसंगी राजू अकोटकर , विकास येवले , प्रदीप देशमुख , सुयोग खाडे,अभिजित भावे, व तसेच कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.