महत्वाचे

अवघ्या वर्षभराचे प्रेम; पत्नीकडून पतीचा ‘गेम’

अमरावती: वर्षभरापूर्वी त्याने तिच्या घराची ‘छपाई’ केली. त्या कालावधीत ती चक्क ‘त्या’ मिस्त्रीच्या प्रेमात पडली. त्या विवाहबाह्य संबंधांची तिच्या पतीला कुणकुण लागली. थोडे वादही झाले अन् तिने त्या अवघ्या वर्षभराच्या कथित प्रेमापोटी नवऱ्याचाच काटा काढण्याचे ठरविले. कटानुसार, प्रियकराला अमरावतीत बोलावून घेतले अन् ठरल्याप्रमाणे तिने प्रियकराच्या साथीने नवऱ्याचा गेम केला. नवरा जिवाने गेला अन् ते दोघेही थेट हवालातीत पोहोचले. बडनेरा हद्दीत बुधवारी रात्री उघड झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी ही धक्कादायक उकल केली.

हनुमान गढी ते भानखेडा रोडवरील जंगल परिसरात १२ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. प्रमोद बकाराम भलावी (४२, रा. कारला, ता. चांदूर रेल्वे, ह. मु. अंजनगाव बारी) अशी मृताची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही तासात ‘टिम क्राईम’ने उकल केली.

 

पत्नीनेच रचला कट, नेरपिंगळाई घेतले दर्शन

आपल्या संबंधांची पती प्रमोद याला कुणकुण लागली आहे. तो आणि त्याची एक महिला नातेवाईक आपल्याला दररोज त्रास देत आहे. त्यामुळे आता त्याला संपवावेच लागेल, असे छाया हिने प्रियकर विश्वंभर याला सांगितले. तो १० नोव्हेंबर रोजी दुपारी अमरावतीत आला. दोघांनीही दस्तूरनगर येथे हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर नेरपिंगळाई येथे जाऊन दोघांनी देवीचे दर्शन घेतले. सायंकाळच्या सुमारास अमरावतीत परतल्यानंतर त्यांनी बाजारातून कोयता विकत घेतला.

 

आरोपी पत्नीनेच पतीच्या मिसिंगची तक्रार नोंदविली होती. मात्र पती नेमका कुणासोबत बाहेर पडला, याबाबत तिने चुकीची माहिती दिली. त्यामुळे तिच्यावर संशय बळावला. चौकशीदरम्यान प्रेमसंबंधांची माहिती मिळाली. त्यानुसार दोघांनाही अटक केली. दोघांनीही खुनाची कबुली दिली.

– संदीप चव्हाण, प्रमुख, गुन्हे शाखा

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.