महाराष्ट्र

अमरावतीच्या वाहतुकीला नवी गती! आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची प्रकल्पांना ‘फास्ट ट्रॅक’ची हाक

-अमरावती : अमरावती शहराची वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांना वेग देण्यासाठी महापालिकेत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा बैठक पार पडली. शहराच्या वाढत्या वाहतुकीला आधुनिक, सुरक्षित आणि सुकर पर्याय देण्याच्या दृष्टीने राजापेठ अंडरपास, गोपाल नगर अंडरपास, राजकमल चौक उड्डाणपूल, तसेच एफ.ओ.बी.सह एकूण सहा महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे तांत्रिक व कामकाज स्थितीचे बारकाईने परीक्षण करण्यात आले.

बैठकीत आयुक्त चांडक यांनी संबंधित विभागांना कामे वेळेत, गुणवत्तेच्या निकषांनुसार आणि नागरिकांसाठी त्रासमुक्त पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट व कडक निर्देश दिले. शहराच्या वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देत त्यांनी प्रकल्पांना ‘फास्ट ट्रॅक’वर आणण्यावर भर दिला.

अमरावतीच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा घडविणाऱ्या या प्रकल्पांमुळे शहराला नवे रूप मिळणार असून, नागरिकांना अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.