ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

मी मातीकाम करेन, मला सस्पेंड करा, पण बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही; महिलेचा संताप

मी मातीकाम करेन, मला सस्पेंड करायचं तर करा. पण, बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही.

नाशिक : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा (Republic day) उत्साह पाहायला मिळत असून गाव, शाळांपासून ते राजपथपर्यंत सर्वत्र ध्वजारोहन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहन केले जात असून नाशिकमध्ये काहीसा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. नाशिकमध्ये (nashik) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. मात्र, येथील कार्यक्रमात संविधान पुरुष महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आपल्या भाषणात त्यांनी घेतलं नसल्याचे सांगत वन विभागाच्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. माधवी जाधव असं महिलेचं नाव असून त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे.

 

मी मातीकाम करेन, मला सस्पेंड करायचं तर करा. पण, बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. पालकमंत्री हे संविधानामुळे आहेत, कोणताही जातीभेद नाही. सर्व समानता संविधानामुळे आहे. पण, जे लोकं संविधानाला कारणीभूत नाहीत, लोकशाहीला कारणीभूत नाहीत त्यांची नावं वारंवार घेतली. मात्र, जे संविधानाला कारणीभूत आहेत, प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव का घेतलं जात नाही, असे म्हणत महिला पोलीस कर्मचाऱ्याने तीव्र भावना व्यक्त केल्या. या पोलीस महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

दरम्यान, नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे नाव न घेतल्याचा आरोप करत एका महिला कर्मचाऱ्याने थेट त्यांना जाब विचारला. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचे नाव माधवी जाधव असून त्या वन विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे. त्यांनी जाब विचारताच उपस्थित पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.