आरोग्यताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

मधुमेहींना चालणं का गरजेचं आहे? जाणून घ्या वैज्ञानिक मत!

मधुमेहवार नियंत्रण हवंय? मग ‘दररोज चालणं’ ठरू शकतं तुमचं गुप्त शस्त्र! सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. एकदा का मधुमेह शरीरात शिरला, की तो आयुष्यभराची साथ देतो. रोज तपासणी, आहारावर नियंत्रण, औषधं आणि डॉक्टरांचे सल्ले. हे सर्व चालूच राहतं. पण तज्ञ सांगतात की दररोज ‘चालणं’ ही एक साधी सवय मधुमेहावर प्रभावी नियंत्रण ठेवू शकते. चालण्यानं रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते, वजन आटोक्यात राहतं आणि शरीरही सक्रिय राहतं. पण नेमकं दिवसातून किती वेळ चालावं? कोणती काळजी घ्यावी? हे सगळं जाणून घ्या खालील लेखात. कारण, आरोग्यासाठी ‘पावलोपावली’ घ्यायला हवी जबाबदारी!

 

शरीरात ताण वाढवणाऱ्या कॉर्टिसोल हार्मोनचे उत्पादन झाल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढते, असं तज्ञांच म्हणणं आहे. म्हणून तज्ञ योग, ध्यान आणि व्यायाम करण्याचा सल्ला देतात. निरोगी जीवन जगण्यासाठी शारीरिक हालचालींची आवश्यकता असते आणि त्यासाठी नियमित चालणे आवश्यक असल्याचं तज्ञांचं मत आहे. नियमित चालल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

 

  • वेळापत्रक तयार करा : ज्यांच्याकडे वेळ नाही किंवा ज्यांना दिवसातून 30 मिनिटे चालता येत नाही त्यांना त्यांचा वेळ विभागून घेण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. जे लोक सलग 30 मिनिटं चालू शकत नाही त्यांनी 10-10-10 मिनिट असं करत 30 मिनिटं चालावं. तज्ञांच्या मते, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणानंतर किमान दहा मिनिटे चालल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. असं केल्याने अन्न पचण्यास देखील मदत होते. म्हणूनच जेवणानंतर १० मिनिटे चालण्याचा सल्ला दिला जातो.
  • नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, जेवणानंतर फक्त 2 मिनिटे चालल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. याव्यतिरिक्त, ताशी तीन ते चार मैल मध्यम गतीने चालल्याने इन्सुलिनची पातळी वाढू शकते आणि हृदयरोगावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
  • खबरदारी घेणे अनिवार्य : चालण्यापूर्वी तज्ञ अनेक खबरदारी घेण्याचा सल्ला देतात. सांध्यावर दबाव येऊ नये म्हणून, सळर जागेवरून चालावं. जिना उतराना नेहमी पायऱ्यांचा वापर करावा. तसंच सकाळ किंवा संध्याकाळ हवामान अनुकूल असताना चालण्यासाठी विशेष वेळ राखून ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
  • चालण्याचे अधिक फायदे
  • स्नायूंना बळकटी देते: तज्ञ म्हणतात की नियमित दररोज चालण्याने स्नायू बळकट होतात आणि शरीराचा आकार बदलतो. ते स्पष्ट करतात की शरीर वाकण्याऐवजी सरळ उभे राहते.
  • वजन कमी करा: तज्ञांचे म्हणणे आहे की दररोज 30 मिनिटे चालल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. चालण्यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.
  • त्वचा उजळवते: तज्ञांचं म्हणणं आहे की, चालण्यामुळे रक्ताभिसरण वाढते. यामुळे त्वचेला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात. परिणामी, ते चेहऱ्यावरील निस्तेजपणा दूर करते आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक प्रदान करते.

हेही वाचा

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.