ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

पन्नगेश्वर कारखान्यावर मनसेचा मोर्चा

शेतकऱ्यांचे शेअर्स नियमित करून घ्या; अन्यथा कारखाना चालू देणार नाही: नागरगोजे

लातूर  : शेतकऱ्यांचे शेअर्स नियमित करून घ्या आणि कामगारांच्या पगाराची 12.5 कोटी, ऊस बिलाचे 3 कोटी आणि तोड वाहतुकीचे 2.5 कोटींची थकबाकी द्या, अन्यथा कारखाना चालू देणार नाही, असा इशारा मनसेचे शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी दिला. पानगाव येथील पन्नगेश्वर साखर कारखाना विमल अग्रो फुड्सने विकत घेतला असून पन्नगेश्वर कारखान्याकडील शेतकऱ्यांचे शेअर्स नियमित करून घेण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी  मनसेच्यावतीने शुक्रवारी कारखान्यावर शेतकरी व कर्मचारी कामगारांचा मोर्चा काढण्यात आला.

मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व कर्मचाऱ्यांना घेऊन विराट मोर्चा निघाला. शेतकऱ्यांचे जुने सर्व शेअर्स विमल अग्रो फुड्स लिमिटेड ने नियमित करून घ्यावेत. सर्व कर्मचाऱ्यांचा थकीत12.5 कोटी रुपये पगार त्यांना तात्काळ देण्यात यावा व त्यांना जुन्या वेतनश्रेणीसहित कामावर परत रुजू करून घेण्यात यावे. शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलाचे 3 कोटी रुपये तात्काळ देण्यात यावेत. तोड वाहतुकीचे थकीत 2.5 कोटी रुपये तात्काळ देण्यात यावेत. या सर्व मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

यावेळी मोर्चात मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे, भागवतराव शिंदे, बाळासाहेब मुंढे व शेतकरी कर्मचाऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी ईश्वर गुडे, रवी सूर्यवंशी, अंकुश शिंदे, मनोज अभंगे, किरण चव्हाण, वाहेद शेख, पांडुरंग कदम, गोविंद दुड्डे, संतोष दाणे, नरसिंग भताने, इमरान मणियार, चेतन चौहान, सूर्यकांत गालफाडे, संभाजी सिरसाट, ऋषिकेश माने, भागवत कांदे, दौलत मुंढे,प्रमोद अंबेकर, दशरथ कराड, बालाजी हनवते, शादुल्ला आत्तार, अविनाश वाघमारे, सतीश वाघमारे, शहनशाह सय्यद, प्रमोद कांदे, असिफ शेख यांच्यासह हजारो शेतकरी व कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.