ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चक्क परतवाडा-अंजनगाव महामार्गावरच सिलिंडरची रांग

परतवाडा : परतवाडा-अंजनगाव मार्गावरील इंडेन कंपनीच्या गॅस एजन्सीच्या गोदामासमोर ग्राहकांनी मंगळवारी सकाळी ९ वाजता आपले सिलिंडर चक्क नॅशनल हायवेवर रांगेत लावले. मंगळवारी सकाळी ९ पासून गोडाऊन बंद असल्याने संतापलेल्या ग्राहकांनी अर्ध्या रस्त्यापर्यंत सिलिंडरच्या रांगा लावल्या होत्या. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरू शकत होता.

गॅस गोडाऊन अगदी रस्त्याला लागून आहे. ग्राहकांना सिलिंडर मिळवण्यासाठी दुसरी कोणतीही जागा उपलब्ध नसल्याने त्यांना नाइलाजास्तव मुख्य महामार्गाचा वापर करावा लागत आहे. मंगळवारी सकाळी कार्यालय बंद राहिल्याने आणि उन्हाचा पारा वाढत असल्याने ग्राहक उन्हात उभे होते, तर रिकामे महामार्गावर. सिलिंडर भरधाव वाहनांच्या या मार्गावर अशा प्रकारे सिलिंडर रांगेत लावून रस्ताच अडवल्याचा प्रकार वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त करणारा ठरला.

इराण-अमेरिका-इस्त्राईल युद्धामुळे सिलिंडर तुटवड्याची बिकट स्थिती तालुकास्तरावर अद्याप सावरलेली नाही, हे परतवाडा-अंजनगाव महामार्गावर लागणाऱ्या सिलिंडरच्या रांगेने स्पष्ट केले आहे.

 

व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार एजन्सी मालकाने ग्राहकांसाठी किमान शेड किंवा बसण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र, कोणतीही सोय नाही. दीड तास हा प्रकार सुरू होता. याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्यारेलाल प्रजापती यांनी ‘लोकमत’शी बोलताना प्रशासकीय अनास्थेवर तीव्र संताप व्यक्त केला.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.