ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

दिव्यांग बांधवांना युडीआयडी कार्ड वितरित करण्यासाठी राज्यभर शिबिरे राबवू -निताताई ढवाण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) दिव्यांग सेलच्या प्रदेशाध्यक्ष नीताताई धवान यांचे शहरात स्वागत

 

दिव्यांगांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादीचे “दिव्यांग जोडो अभियान”

अमरावती :-शारीरिक दृष्ट्या असामान्य असलेल्या दिव्यांग घटकांच्या उत्थानासाठी चांगले काम करण्याचे विधायक धोरण उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनीआखले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातही दिव्यांग योजनांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून दिव्यांग प्रकारात मोडणाऱ्या लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांना प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादीने दिव्यांग जोडो अभियान सुरु केले आहे. कुठलाही दिव्यांग बांधव शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये , म्हणून त्यांचे सर्व्हेक्षण करून दिव्यांग बांधवांना युडीआयडी कार्ड वितरित करण्यासाठी राज्यभर शिबिरे राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) दिव्यांग सेलच्या प्रदेशाध्यक्ष निताताई ढवाण यांनी दिली.

अमरावती शासकीय विश्राम गृह येथे आज दिनांक २८ मे २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) दिव्यांग सेलच्या प्रदेशाध्यक्ष निताताई ढवाण यांचे आगमन झाले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहरच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिव्यांग जोडो अभियान विषयी माहिती दिली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी नेहमीच दिव्यांग बांधवांचे हित व कल्याणासाठी तळमळ बाळगली आहे. शासनाच्या वतीने दिव्यांगांचे सबळीकरण झाले पाहिजे यासाठी शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात असून त्यांना विशेष शिक्षण, शासकीय नोकरी, रोजगार , स्वयंरोजगार, अर्थसहाय्य, कर्ज योजना, विविध उपकरणे,सवलत योजना, आवास आदीच्या माध्यमातून त्यांचे उत्थान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी अनुदानात सुद्धा वाढ करण्यात आली असल्याने शासन स्तरावर त्याची अंमलबजावणी सुरु आहे. त्यामुळेच दिव्यांग घटकांसाठी चांगले काम करता यावे, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना पक्षात प्रतिनिधित्व देण्यात आले असून राज्यासह विभाग , जिल्हा व शहर तसेच वार्ड व ब्लॉक स्तरावर सुद्धा राष्ट्रवादी दिव्यांग सेल स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) दिव्यांग सेलच्या प्रदेशाध्यक्ष निताताई ढवाण यांनी दिली.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमरावती शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांच्या नेतृत्वात श्रीमती रेखाताई सोपान बोन्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांना दिव्यांग कल्याणासाठी काम करण्याची माहिती असल्याने त्यांच्यावर या संदर्भातील जबाबदारी देण्याची सूचना सुद्धा प्रशांत डवरे यांनी केली. यावेळी माजी मनपा सभापती तथा राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ता अविनाश मार्डीकर यांनी सांगितले की, अमरावती महानगर पालिकेच्या बजेटमध्ये ३ टक्के निधी दिव्यांग विकासासाठी राखीव असतो. त्यामुळे महापालिका क्षेत्रात दिव्यांग घटकांसाठी चांगले काम करता येणार असल्याचे अविनाश मार्डीकर यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऋतुराज राऊत यांनी सांगितले की,शहरात दिव्यांग घटकांसाठी काम करणाऱ्या काही संस्था व संघटना आपल्या संपर्कात असून दिव्यांग बांधवांना युडीआयडी कार्ड वितरित करण्यासाठी शिबिरे व विविध उपक्रम राबविली जाईल.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमरावती शहर अध्यक्ष प्रशांत डवरे, प्रवक्ता अविनाश मार्डीकर, उपाध्यक्ष भूषण बनसोड, राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे प्रमुख मंगेश मनोहरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (शहर ) ऋतुराज राऊत, व्हीजेएनटी सेल प्रमुख भास्कर ढेवले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संकेत बोके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आकाश हिवसे, अभिमन्यू तायवाडे, निलेश शर्मा, पार्टी प्रवक्ता प्रा. सनाउल्ला खान,मुश्ताकभाई सौदागर , मोईन खान, नदीमुल्ला सर, प्रवीण आकोडे , सार्थक खोरगडे, प्रतीक डुकरे, मनीष पाटील, सारंग देशमुख , प्रवीण राऊत ,प्रवीण पारडे, निलेश वडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर प्रसिद्धी प्रमुख अमित तायडे यांनी प्रेषित केली आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia