मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्याची जय्यत तयारी

हिंगोली : शहरातील रामलीला मैदानावर २९ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली असून या निमित्ताने विविध विकास कामे व महिला मेळावा भाजपाच्या वतीने घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस व मंत्र्याच्या उपस्थितीत विविध विकास कामाचे उद्घाटन केल्या जाणार असल्याने रामलीला मैदानावर वॉटर प्रुप सभामंडप उभारण्यात आला आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून २७ मे रोजी हिंगोली विधानसभा मतदार संघाचे आ. तानाजी मुटकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आ. गजाननराव घुगे यांच्यासह अनेकांनी पाहणी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार हे २९ मे रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत. या निमित्ताने भाजपाच्या वतीने विविध विकास कामाचे उद्घाटन व भाजपाचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तसेच या निमित्ताने भाजपाच्या वतीने २७ मे रोजी भाजपा जिल्हा कार्यालयात हिंगोली जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व महिलांची बैठक घेवून २९ मे रोजी होणार्या विकास कामाच्या कार्यक्रमाला व महिला मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आ.तानाजी मुटकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. गजानन घुगे यांच्यासह भाजपाचे पदाधिकार्यांनी मेळाव्याची होणारी जय्यत तयारीची पाहणी करून संबंधीतांना राहिलेल्या त्रृट्याचे नियोजन करण्याच्या सुचना आ. तानाजी मुटकुळे यांनी यावेळी दिल्या. तसेच भाजपा पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी आ. तानाजी मुटकुळे म्हणाले की, शेतकरी व महिला मेळावा २९ मे रोजी रामलीला मैदानावर होणार असल्याने या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. तानाजी मुटकुळे यांनी यावेळी केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्याचा पहिलाच दौरा असल्याने त्यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेला लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. तानाजी मुटकुळे यांनी भाजपा बैठकीत केले.
या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आ. गजाननराव घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, अॅड. के.के. शिंदे, उमेश गुठ्ठे, सुभाष लदनिया, जिल्हा सरचिटणीस डॉ. उमेश नागरे, माजी आ. रामराव वडकुते, शहराध्यक्ष रजनीश पुरोहित, सेनगाव तालुकाध्यक्ष श्रीकांत कोटकर, गोरेगाव तालुकाध्यक्ष डॉ. रवि पाटील, हिंगोली तालुकाध्यक्ष माणिकराव लोंढे, कळमनुरी शहराध्यक्ष ओंकार गावंडे, कळमनुरी ग्रामीण मंडळाध्यक्ष विठ्ठल भोयर, सिरसम मंडळाध्यक्ष श्रीधर ठिंगणे, आखाडा बाळापूर मंडळाध्यक्ष डॉ.सुधाकर लोमटे, सर्जेराव दिंडे, विष्णु बोचकरी, ज्ञानेश्वर गुंजाळ, डॉ. आवधुत शिंदे, राजु आहेर यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकार्यांची उपस्थिती होती.

