टेक्नॉलजीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

सुरळीत पाणी पुरवठ्यानंतर आता पुन्हा वीज गुल

हिंगोली (Hi : सिध्देश्वर धरणापासुन पाणी पुरवठा करणाऱ्या विजेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हिंगोली शहरात अनेक दिवस निर्जळीला सामोरे जावे लागले होते. तीन दिवसापूर्वी दुरूस्तीचे काम झाल्यानंतर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत चालू झाला होता. आता मंगळवारी पुन्हा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे (Hingoli power failure) हिंगोलीतील पाणी पुरवठा पुन्हा बंद झाला आहे.

हिंगोली शहराला सिध्देश्वर धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मागील काही दिवसापासून (Hingoli power failure) वीजेची समस्या निर्माण झाल्याने शहर वासीयांना निर्जळीला सामोरे जावे लागले. कसाबसा विज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत झाला.

२७ मे रोजी राहोली शिवारात वीजेच्या खांबावरील इंन्सुलेटर फुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. (Hingoli power failure) परिणामी शहराला होणारा पाणी पुरवठा पुन्हा बंद झाला. शहरवासीयांना निर्जळीला सामोरे जावे लागत असल्याने महावितरणच्या कार्यपध्दती बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.