गावंडगाव येथील घरकुल लाभार्थ्यांना आमदार गजानन लवटे यांच्या हस्ते रेती पासचे वाटप ;सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे यांच्या मागणीला य

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अखेर रमेश सावळे यांच्या मागणी ला यश, घरकुल लाभार्थ्यांना मिळाली रेती पास. काही दिवसांपूर्वी रेती ची पास दया ही मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या मागणी ची दखल घेऊन शासनाने व आमदार गजानन लवटे यांनी दखल घेतली. आणि आज दि. १६ जुन २०२५ रोजी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावडगाव येथील रेती घाटावर जावून दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे व तहसीलदार पुष्पा सोळंके मॅडम यांच्या हस्ते मोजक्या रेतीच्या पासचे वाटप करण्यात आले आहे. गोरगरिबांना न्याय देणे हेच आमचं कर्तव्य आहे. घरकुलधारकांना घरकुल बांधण्यासाठी रेतीचा त्रास होत होता. परंतु आता रेतीची पास मिळ्याल्यामुळे बाधकाम पूर्ण होणार असून घरकुलधारकांना दिलासा मिळणार आहे .आता शासनाचे लक्ष टार्गेट घरकुल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे याच्या मागणी नूसार अंजनगाव सुर्जी तालुक्यात पासचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार गजानन लवटे व तहसीलदार सोंळके मॅडम व गटविकास अधिकारी खाताळे साहेब यांच्या सहकार्याने आपल्या घरकुल धारकांना हेच आपलं कर्तव्य समजून आमदार व खासदार या मतदारसंघाचे विकासासाठी कटिबद्ध असून ती आम्ही पूर्ण करू असं मत आमदार गजानन लवटे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार गजानन लवटे, तहसीलदार पुष्पा सोळंके मॅडम, सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे,कपिल देशमुख ,अनिकेत कळस्कर, तलाठी सोळंके ,सचिव माने साहेब ,पोलीस पाटील प्रतिक हरणे, गणेश हरणे ,विनायक इंगळे, अरुण रेखे, विनोद कांबे, गजानन हरणे, ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

