ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

अंजनगाव सुर्जी तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; पान पिंपरी केळी, संत्रा पिकांचे नुकसान

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : तालुक्यात अचानक झालेल्या वादळी वारा पावसाने देवगांव, खोडगाव ,दहिगाव, पांढरी या भागातील पान पिंपरी, संत्रा,केळी पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या कर्जबाजारी होऊन केळी, पान पिपरी ह्या महागड्या खर्चाच्या पिकाची लागवड केली असतांना आता पीक काढणीला येणार होते. परंतु अचानक झालेल्या वादळी वारा पावसाने ऐन तोंडाशी आलेले केळीचे पीक हे जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत
द्यावी अशी मागणी देवगांव, खोडगाव, पांढरी, दहिगाव या भागातील शेतकरी करत आहेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.