ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
चांदूर रेल्वेत बाजार समितीमध्ये शासकीय ज्वारी खरेदीला प्रारंभ

चांदूर रेल्वे स्थानिक खरेदी-विक्री संघाच्यावतीने ३,२८० रुपये या आधारभूत किमतीत शासकीय ज्वारी खरेदीला २६ मे रोजी प्रारंभ करण्यात आला. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते शेतकरी पंढरी गोरले (रा. टिटवा) तसेच रवी हिरडे (रा. घुईखेड) यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जगदीश आरेकर, माजी नगराध्यक्ष नीलेश सूर्यवंशी, तालुका काँग्रेस अध्यक्ष अमोल होले, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, उपाध्यक्ष पंकज शिंदे व खरेदी संघाचे सर्व संचालक उपस्थित होते.

